आजच्या दिवशी म्हणजे २० मार्च २०११ रोजी वर्ल्ड कपमधील एका सामन्यात युवराजने धमाकेदार खेळी केली होती. स्पर्धेत भारताची लढत वेस्ट इंडिजविरुद्ध होती. चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवरील सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्मय घेतला. पण भारताचे सलामीवीर सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीर लवकर बाद झाले. भारताची अवस्था २ बाद ५२ अशी होती. तेव्हा मैदानात आला भारताचा युवराज आणि त्याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.
या सामन्यात युवराजने १२३ चेंडूत १० चौकार आणि दोन षटकारांसह ११३ धावांची शतकी खेळी केली. ही शतकी खेळी करत असताना युवराजला दोन वेळा मैदानात रक्ताची उलटी झाली. तेव्हा युवराजला कॅन्सर होता आणि याची माहिती ना युवराजला होती ना संघ व्यवस्थापनाला. पण युवराज खेळला आणि भारताला विजेतेपद मिळून दिले.
चेन्नईच्या संथ विकेटवर युवराजने शतक झळकावले. नंतर कॅन्सरवरील उपचार झाल्यानंतर २०१४ मध्ये एका मुलाखतीत तो म्हणाल, चेन्नईतील उष्णतेमुळे रक्ताची उलटी झाल्याचे मला वाटले. वर्ल्ड कपमध्ये शतक करण्याची माझी इच्छा होती पण ती कधी झाली नव्हती. विरेंद्र सेहवाग स्पर्धेतून बाहेर झाल्याने मी ठरवले वरच्या क्रमांकावर फलंदाजी करेन आणि मोठी धावसंख्या उभी करेन.
वेस्ट इंडिजविरुद्ध रक्ताची उटली होत असताना मी देवाकडे इतकीच प्रार्थना करत होतो की काहीही होऊ दे. माझा मृत्यू झाला तरी चालेल पण भारताला वर्ल्ड जिंकून द्यायचा आहे.
या सामन्यात युवराजने विराट सोबत तिसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची भागिदारी केली. विराट ५९ धावांवर बाद झाला. भारताने २६८ धावा केल्या आणि नंतर वेस्ट इंडिजवर ८० धावांनी विजय मिळवला.
या स्पर्धेत युवराजने ३६२ धावा आणि १५ विकेट घेत मालिकावीर पुरस्कार मिळवला. युवराजने भारताकडून ३०४ वनडे, ५८ टी-२० आणि ४० कसोटी सामने खेळले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times