भारताने दुसरा डाव जाहीर करून न्यूझीलंडसमोर विजयासाठी २८३ धावांचे आव्हान दिले होते. न्यूझीलंडच्या डावातील तिसऱ्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर विल यंग बाद झाला. अश्विनने टाकलेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू विलच्या पॅडला लागला, त्यावर भारतीय खेळाडूंनी अपील केली आणि अंपायरने बाद दिले. विलने अंपायरच्या निर्णयावर डीआरएस घ्याचा की नाही यासाठी त्याच्य सहकाऱ्याकडे विचारणा केली. डीआरएससाठी १५ सेंकदाचा वेळ उपलब्ध असतो. पण विलने एका सेकंदाचा वेळ केला आणि त्यामुळे डीआरएस घेता आला नाही.
वाचा- श्रेयस अय्यरने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास घडवला, अशी कामगिरी आजवर कोणाला जमली नाही
या विकेटचा जेव्हा रिप्ले पाहण्यात आला तेव्हा चेंडू विकेटला लागत नसल्याचे दिसत होते. विलने जर योग्यवेळी डीआरएसचा निर्णय घेतला असता तर त्याला मैदान सोडावे लागले नसते.
वाचा- ‘माझी संघात निवड करू नका’; हार्दिक पंड्याने निवडकर्त्यांना केली विनंती
भारताने दुसऱ्या डावात ७ बाद २३४ धावा केल्या. एक वेळ अशी होती की भारताने ५१ धावांवर ५ गडी गमावले होते. त्यानंतर श्रेयस अय्यर, आर अश्विन आणि वृद्धिमान साहा यांच्या फलंदाजीमुळे भारताचा डाव सावरला. भारताकडून दुसऱ्या डावात श्रेयस अय्यरने ६५ तर साहाने नाबाद ६१ धावा केल्या. या शिवाय अश्विनने ३२ धावांचे योगदान दिले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times