IND वि NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे खेळण्यात आलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित ठरलाय. मात्र, या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनं (Ravichandran Ashwin) नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. या सामन्यातील अखेरच्या दिवशी अश्विननं टॉम लॅथमची विकेट घेऊन भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंहचा (Harbhajan Singh) विक्रम मोडीत काढलाय.

न्यूझीविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात अश्विननं त्याच्या कारकिर्दीतील 418 वा विकेट्स मिळवलाय. या कामगिरीसह तो भारताकडून कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरलाय. या यादीत हरभजन सिंह तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याच्या नावावर 417 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. त्यानं 103 कसोटी सामन्यात अशी कामगिरी करून दाखवली होती. मात्र, अश्विननं केवळ 80 व्या कसोटी सामन्यात 418 वा विकेट्स पटकावून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाच्या यादीत तिसऱ्या स्थानी झेप घेतलीय.

भारताकडून सर्वाधिक कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेंच्या नावावर आहे. त्यांनी 132 कसोटी सामन्यात 619 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर कपिल देव यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या नावावर 434 विकेट्सची नोंद आहे.

अश्विननं 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण केलं होतं. त्यानं गोलंदाजीसह फलंदाजीत आपली जादू दाखवली आहे. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 2 हजार 85 धावा केल्या आहेत. ज्यात पाच शतकांचा समावेश आहे. त्यानं भारतासाठी 111 एकदिवसीय सामन्यात 150 विकेट्स घेतले आहेत. तर, 51 टी-20 मध्ये 61 विकेट्स घेतले आहेत.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here