नवी दिल्ली: भारताची इंग्लंडविरुद्ध नेटवेस्ट ट्रॉफीमधील फायनल मॅच कोणताही भारतीय चाहता विसरणार नाही. इंग्लंडने भारताला ३२६ धावांचे आव्हान दिले होते. भारताचा डाव कोसळला असताना आणि यांनी पाचव्या विकेटसाठी १४६ धावांची भागिदारी करत भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. देशभरात संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन प्रत्येक जण करत असताना अचानक युवी-कैफची ही खेळी चर्चेत आली आहे.

वाचा-
देशाचे यांनी माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांच्या करोना व्हायरस संदर्भातील जनतेला केलेल्या आवाहनाचे कौतुक केले आहे. युवी आणि कैफने रविवारच्या जनता कर्फ्युला समर्थन दिले होते आणि करोना रोखण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगितला होता. पंतप्रधान मोदींनी या दोघांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. या दोघांची भागिदारी आपल्याला नेहमी लक्षात आहे. तशीच एक भागिदारी पुन्हा एकदा करण्याची गरज आहे. भारतातून करोना हद्दपार करण्यासाठी एकमेकांचे भागिदार व्हा, असे मोदींनी म्हटले आहे.

वाचा-

पंतप्रधान मोदींनी गुरुवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात २२ मार्च रोजी घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या या आवाहनाला अनेक कलाकार आणि खेळाडूंनी पाठिंबा दिला आहे.

वाचा-

मोदींनी युवी-कैफ यांच्या भागिदारीचा उल्लेख करत जनतेला करोना विरुद्ध लढण्याचे आवाहन केले आहे. युवी-कैफ यांनी इंग्लंडविरुद्ध केलेली खेळी आजही क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात आहे. या सामन्यात युवराजने ६९ तर कैफने नाबाद ८७ धावा केल्या होत्या. भारताने हा सामना २ विकेट आणि ३ चेंडू राखून जिंकला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here