नवी दिल्ली: माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या भारतीय संघातील पुनरागमनावर एक मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. आयपीएलमधील चांगल्या कामगिरीच्या आधारावर धोनीला भारतीय संघात प्रवेश करण्याची संधी आहे. पण करोना व्हायरसमुळे आयपीएल होणार की नाही याबद्दलच अनिश्चितता आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी धोनीचा भारतीय संघात समावेश होईल की नाही यावर सध्या चर्चा सुरू आहे.

वाचा-
दोन दिवसांपूर्वी माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी धोनी भारताकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळताना दिसण्याची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केले होते. आता गावस्करांच्या पाठोपाठ आणखी एका क्रिकेटपटूने धोनीबाबत मोठे विधान केले आहे.

वाचा-
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात धोनीचा समावेश करावा का? या प्रश्नावर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू याने नाही असे उत्तर दिले आहे. टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात धोनीचा समावेश केला जाऊ नये. धोनी बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आता धोनीने आयपीएल स्पर्धा खेळली तरी तो पुरेसा ठरणार नाही. ऑस्ट्रेलियातील परिस्थिती आणि भारतातील स्थानिक लीग स्पर्धेतील परिस्थितीत फार फरक असेल, असे मत हॅगने व्यक्त केले.

वाचा-

सोशल मीडियावर एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हॉगने धोनीचा समावेश भारतीय संघात करू नये असे मत व्यक्त केले. धोनीने मोठ्या काळापासून आंतरराष्ट्रीय सामने खेळले नाहीत. आयपीएल स्पर्धा झालीच तर अधिकतर सामने चेन्नईत होतील. चेन्नईत फिरकी गोलंदाजीसाठी उत्तम आहे. तर ऑस्ट्रेलियातील गोलंदाजी जलदसाठी उत्तम असते. ज्या पद्धतीचे वातावरण चेन्नईत असेल तसे ऑस्ट्रेलियात मिळणार नाही, असे हॉग म्हणाला.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here