नवी दिल्ली: जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या १५व्या हंगामाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. २०२२ साली होणाऱ्या स्पर्धेसाठी आठ संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवली आहे. आता काही दिवसात मेगा लिलाव देखील होईल. ही सर्व तयारी सुरू असताना आयपीएलमध्ये बंडखोरीचे सुर उमटले आहेत.

वाचा-

आयपीएलमध्ये होणाऱ्या मेगा ऑक्शन अर्थात लिलावावर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. स्पर्धेत आता मेगा लिलाव होऊ नये. ही व्यवस्था संपुष्टात आणण्याची गरज आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर आणि दिल्ली कॅपिटल्सचे पार्थ जिंदल यांच्या मते आयपीएलमध्ये आता मोठ्या लिलावाची आता तितकी गरज राहिलेली नाही.

वाचा-

स्पर्धेतील या दोन महत्त्वाच्या संघातील अधिकाऱ्यांच्या मते आता मोठ्या लिलावाची गरज नाही. मोठा लिलावात सर्वांना समान संधी मिळत नाही. एका वेबसाइटशी बोलताना म्हैसूर म्हणाले, लीग आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. स्पर्धेत येणाऱ्या नव्या खेळाडूंसाठी ड्राफ्ट तयार करता येऊ शकतो किंवा परस्पर सहमतीने त्यांना संघात घेता येऊ शकेल. खेळाडूंना लोनवर घेतले जाऊ शकते. आम्हाला मोठ्या कालावधीसाठी संघ तयार करण्याची परवानगी द्यावी.

वाचा-

आयपीएलच्या प्रत्येक संघाकडे त्याची त्यांची अकादमी आहे आणि व्यवस्था देखील आहे. ही व्यवस्था युवा आणि अनकॅप्ड खेळाडूंना तयार करते. या सर्व गोष्टी केल्यानंतर खेळाडूंना लिलावात पाठवण्या ऐवजी त्यांना रिटेन करून संघ भविष्यात गुंतवणूक करू शकते. एक वेळ होती जेव्हा मोठ्या लिलावात सर्व संघ एका समान स्तरावर येत होते. अर्थात तेव्हा देखील आम्हाला असे वाटत होते की जर संघांना काही खेळाडूंना पुन्हा निवडण्याचा अधिकार मिळत असेल तर तो रिटेशन नव्हे तर राइट टू मॅच कार्डच्या माध्यमातून मिळायला हवा.

वाचा-

दिल्ली कॅपिटल्सचे जिंदल म्हणाले, श्रेयस अय्यर, शिखर धवन, कगिसो रबाडा आणि अश्विन यांना गमवण्याचा निर्णय वाईट होता. आयपीएलच्या रिटेन धोरणानुसार आम्ही या खेळाडूंना रिटेन करू शकलो नाही. मला वाटते की या गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे. तुम्ही एक संघ तयार करता, युवा खेळाडूंना संधी देता. त्या खेळाडूंना तयार केल्यानंतर ते आयपीएल आणि नंतर काउंटी किंवा स्वत:च्या देशाचे प्रतिनिधित्व करतात आणि ३ वर्षानंतर तुम्ही त्यांना गमावता.

यावर्षी दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स या संघांनी प्रत्येकी ४ खेळाडू रिटेन केले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादने प्रत्येकी ३ तर पंजाब किंग्जने २ खेळाडूंना रिटेन केले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here