वाचा-
क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंनी अशा प्रकारे टाळ्या वाजवून पोलिस, डॉक्टर, सफाई कामगार, नर्स यांचा सन्मान केला होता. माजी ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर याने या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून एक प्रश्न विचारला आहे. विजेंदरचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाचा-
गेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण दिल्लीतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या विजेंदरने एक ट्विट केले आहे. तो म्हणतो, सर नरेंद्र मोदी, तुम्ही देखील तुमचा व्हिडिओ अपलोड करा. आम्हाला पाहायचे आहे की तुम्ही पाच वाजता टाळी वाजवली होती. तुम्ही माझा व्हिडिओ पाहू शकतो.
वाचा-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला संपूर्ण देशातील नागरिकांनी पाठिंबा दिला होता. काल रविवारी देशातील सर्व नागरिक घरीच थांबले होते आणि पाच वाजता सर्वांनी टाळ्या वाजवून करोनाविरुद्ध लढणाऱ्या लोकांचा सन्मान केला होता. या घटनेचे देशभरातील व्हिडिओ व्हायरल झाले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times