नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने १९८३ साली वर्ल्ड कप सर्व प्रथम जिंकला होता. त्यानंतर २० वर्षांनी पुन्हा एकदा भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्याची संधी होती. कारण भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. पण भारताच्या दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याच्या स्वप्नावर ऑस्ट्रेलियाने पाणी फेरले. आजच्या दिवशी २००३ मध्ये भारतीय संघाने वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्यांदा फायनल मॅच खेळली होती. या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला होता आणि कोट्यवधी भारतीय चाहत्यांसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे स्वप्न भंगले होते.

वाचा-
२३ मार्च २००३ रोजी भारत दुसऱ्यांदा वर्ल्ड कप खेळत होता. भारताची लढत दोन वेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत होती जोहान्सबर्गच्या वॉडर्स मैदानावर भारताची लढत होती. कर्णधार सौरव गांगुलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाने या हायव्होल्टेज सामन्यात ३५० हून अधिक धावा केल्या.

वाचा-
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात २ बाद ३५९ धावा केल्या. यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या १२१ चेंडूत ४ चौकार आणि ८ षटकारांसह १४० धावांचा समावेश होता. तर डेमियन मार्टिनने ८८ धावा केल्या होत्या. या सामन्यात गांगुलीने ८ गोलंदाज वापरले होते. भारताकडून हरभजन सिंहने २ विकेट घेतल्या.

वाचा-
भारतीय संघातील विरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली हे दोघेही तेव्हा शानदार फार्ममध्ये होते. सचिनने तर स्पर्धेत ६००हून अधिक धावा केल्या होत्या. पण अंतिम सामन्यात सचिन ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर गांगुली आणि सेहवागने डाव सांभाळला. पण गांगुली २४ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर ३९.२ षटकात भारताचा डाव २३४ धावांवर संपला. सेहवागने या सामन्यात सर्वाधिक ८२ धावा केल्या.

वाचा-
२००३च्या वर्ल्ड कपमध्ये सचिनने ६१.१८च्या सरासरीने आणि ८९.२६च्या स्ट्रईकरेटने ७५ चौकार आणि ४ षटकारांसह १ शतक आणि ६ अर्धशतक झळकावले होते. एका वर्ल्ड कप स्पर्धेत कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वोच्च धावा होत्या. सचिनला मालिकावीर म्हणून गोल्डन बॅट मिळाली पण चौथ्यांचा वर्ल्ड कप खेळणाऱ्या सचिनचे विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण झाले नाही.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here