करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला जगभरात चिंतेचे वातावरण आहे. काही क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत तर काही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेबाबत अजूनही कोणता ठाम निर्णय घेण्यात आलेला नाही. पण आज जपानच्या पंतप्रधानांनी ऑलिम्पिकबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.

करोना व्हायरसमुळे जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा स्थगित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एक मोठा धक्का बसला आहे. एका देशाने करोना व्हायरसमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

गेल्या बऱ्याच वर्षांपासून जपान ऑलिम्पिकची तयारी केली आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे नियोजन करणे सोपी गोष्ट नसते. त्यासाठी काही वेळा स्टेडियम्स बांधावी देखील लागतात. हे सर्व करण्यासाठी बराच काळ, पैसा आणि मेहनत लागते. पण आता ऑलिम्पिक स्पर्धा तोंडावर आली असताना करोना व्हायरस जगभर पसरला आहे आणि त्यामुळे काही क्रीडा स्पर्धा रद्द केल्या आहेत.

ऑलिम्पिकबाबतही काही देशांनी आपली ठोस भूमिका घेतलेली नाही. पण त्यांना ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलावी, असेच वाटत आहे. पण सध्यातरी यजमान जपानला ही गोष्ट पटलेली दिसत आहे. त्यामुळेच त्यांच्या पंतप्रधानांनी आज ऑलिम्पिकबाबत एक मोठे विधान केले आहे.

जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांनी सोमवारी ऑलिम्पिकबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ऑलिम्पिक ते म्हणाले की, ” ऑलिम्पिक स्पर्धा सध्याच्या घडीला पुढे ढकलणे हे अपरिहार्य वाटत आहे.”

रविवारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी म्हटले होते की, ” कारण सर्व गोष्टींपेक्षा माणसाचा जीव महत्वाचा आहे. माणसांच्या जीवापुढे खेळ ही मोठी गोष्ट नाही. ”

रविवारी बॅच यांनी केलेले वक्तव्य आणि सोमवारी अॅबे यांनी मांडलेली भूमिका आपण पाहिली तर यंदाचे ऑलिम्पिक पुढे ढकलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

कॅनडाने ऑलिम्पिक २०२०मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी रविवारी ही घोषणा केली. कॅनडाच्या ऑलिम्पिक समितीने आणि पॅराऑलिम्पिक समितीने करोना व्हायरसमुळे २०२०मध्ये होणाऱ्या दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेणार नसल्याचे म्हटले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here