करोना व्हायरसचा प्रसार चीननंतर सर्वात जास्त इटली आणि इराण या दोन देशांमध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारताच्या एका क्रिकेटपटूची चिंता वाढलेली आहे. कारण या क्रिकेटपूचे वडिल सध्या इराणमध्ये अडकलेले आहे.

चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशातून १५ फेब्रुवारीनंतर ज्यांनी प्रवास केला आहे आणि ते देशात परतले आहेत, त्यांना सक्तीने विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. पण अजूनही या क्रिकेटपटूचे वडिल इराणमध्ये असल्याने त्यांना भारतात कधी आणणार, यासाठी तो चिंतेत आहे.

आयपीएलमधील डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांकडून खेळणाऱ्या आनंद राजनचे वडिल सध्या इराणमध्ये अडकलेले आहे. याबाबतचे ट्विट आनंद राजनने केले आहे. आनंदचे वडिल गेल्या आठ वर्षांपासून इराणमधील तेहरान येथे कामाला आहेत. सध्याच्या घडीला तर त्यांना करोना व्हायरसचा कोणताही त्रास झालेला नाही. मात्र इराणमध्ये फार भयंकर परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना मायदेशात परतायचे आहे. आता भारत सरकार विदेशांमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी नेमके काय करत आहे, याकडे आनंदचे डोळे लागलेले आहेत.

सध्याच्या घडीला इराणमध्ये करोना व्हायरसमुळे भयानक वातावरण आहे. त्यामुळे भारत सरकारने सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आनंदच्या ,वडिलांना लवकर भारतात येता येणार नाही. पण इराणमधील वातावरण करोना व्हायरसमुळे भयावह झाले असल्यामुळे आनंदला त्यांची चिंता सतावते आहे. कारण सध्याच्या घडीला भारत सरकारच्या नियमांमुळे या खेळाडूंच्या वडिलांना भारतातही कधी येता येणार आहे, हेदेखील अजून स्पष्ट झालेले नाही. विदेशातील नागरिकांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे म्हटले जात आहे. पण सध्याच्या घडीला तरी आनंदच्या वडिलांना इराण येथे राहण्यावाचून पर्याय दिसत नाही. त्यामुळेच तो सरकारकडे मदतीचा हात मागत आहे. आता भारतीय सरकार यावर कधी निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे आता भारत सरकारच्या या निर्णयानंतरच आनंदचे वडिल भारतामध्ये येऊ शकतात.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here