मुंबई कसोटीत भारतीय संघाने ३७२ धावांनी धमाकेदार विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल याने पहिल्या डावात भारताच्या सर्व १० विकेट घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. या सामन्यात त्याने एकूण १४ विकेट घेतल्या. एजाजने १० विकेट घेतल्यानंतर अश्विनने पॅव्हेलियनमधून त्याचे अभिनंदन केले होते. त्यानंतर त्याने ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने गंमतीने म्हटले होते की, डियर ट्विटर, एका डावात १० विकेट घेतल्यानंतर एजाज पटेलचे अकाउंट निश्चितपणे वेरिफाय होण्यास पात्र ठरते.
वाचा- विराटला समजावणे अशक्य; आफ्रिका दौऱ्यात हा खेळाडू संघाबाहेर गेल्यास अश्चर्य नाही
अश्विनच्या या ट्विटची चर्चा सोशल मीडियावर झाली होती. हे ट्विट करते वेळी एजाजचे अकाउंट वेरिफाय झाले नव्हते. अश्विनच्या या ट्विटनंतर चाहत्यांनी देखील या गोष्टीला पाठिंबा दिला. त्यानंतर ट्विटरने एजाजचे अकाउंट वेरिफाय केले. आता त्याच्या नावासमोर ब्लू टीक दिसते.

मुंबईत जन्मलेल्या एजाजने दुसऱ्या कसोटीत ४७.५ ओव्हर गोलंदाजी करून भारताच्या १० विकेट घेतल्या होत्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो जगातील फक्त तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने चार विकेट घेतल्या होत्या. पहिल्या डावात त्याने कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजार आणि अश्विन यांना शून्यावर बाद केले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times