नवी दिल्ली: क्रिकेट बोर्डाकडे तब्बल ११ कोटी असताना विविध गटातील संघांचे प्रशिक्षक आणि अन्य सपोर्ट स्टाफ यांचे वेतन गेल्या काही महिन्यांपासून देण्यात आलेला नाही. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघाने हा प्रकार केला आहे. प्रशिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे पगार न देणाऱ्या डीडीसीएने गेल्या चार महिन्यात कायदेशीर बाबींसाठी १.६ कोटी रुपये खर्च केले आहेत.

वाचा-
डीडीसीएशी संबंधित ५० जणांचे पगार देण्यात आलेले नाहीत. यात दिल्लीच्या वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकांचा देखील समावेश आहे. यात भास्कर पिल्ले आणि यांचा देखील समावेश आहे. राजकुमार हे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे लहानपणाचे प्रशिक्षक आहेत. या दोन्ही प्रशिक्षकांचे मिळून ४.५ कोटी इतकी रक्कम अद्याप दिलेली नाही.

वाचा-
डीडीसीएने १६ नोव्हेंबर २०१९ पासून कायदेशीरबाबींसाठी १.६ कोटी खर्च केले आहेत. डीडीसीएने ११ वकीलांना १.६३ कोटी इतकी रक्कम दिली आहे. यातील सर्वाधिक रक्कम ३७.६२ लाख रुपये निवृत्त न्यायमूर्ती दीपक वर्मा यांना देण्यात आली आहे.

वाचा-
करोना व्हायरसमुळे अनेक व्यवहार बंद आहेत. पण कोच, फिजिओ आणि अन्य सपोर्ट स्टाफचा पगार गेल्या काही दिवसांपासून देण्यात आलेला नाही. डीडीसीएकडे ११ कोटी असताना देखील पगार का दिला नाही, असा प्रश्न खुद्द डीडीसीएचे संयुक्त सचिव राजन मनचंदा यांनी उपस्थित केला.

पगार का दिला नाही याचे उत्तर कार्यकारी अध्यक्ष राकेश बंसल आणि सचिव विनोद तिहाडा हेच देऊ शकतील असे मनचंदा म्हणाले.

हे देखील वाचा-

हे देखील-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here