वाचा-
१९९९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ एकापाठोपाठ एक विजय मिळवत होता. तेव्हा पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा एका साखळी सामन्यात पराभव केला होता. पण या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघाने २३ मार्च २०११ पर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत एकही मॅच गमावली नव्हती. या दरम्यान ऑस्ट्रेलिया संघाने तीन वेळा वर्ल्ड कप जिंकला होता. अशा ऑस्ट्रेलियाचा विजय रथ भारतीय संघाने रोखला होता.
वाचा-
आजपासून ९ वर्षांपूर्वी २४ मार्च २०११ रोजी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांची लढत झाली. अहमदाबाद येथील मोटेरा मैदानावर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया संघाने ५० षटकात ६ बाद २६० धावा केल्या. या सामन्यात पॉन्टिंगने १०४ धावा केल्या होत्या.
वाचा-
उपांत्य फेरीत जाण्यासाठी भारताला २६१ धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपमध्ये सलग ३४ सामने जिंकले होते. भारतीय डावाची सुरूवात विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी केली. सेहवाग लवकर बाद झाला. पण त्यानंतर सचिन आणि गौतम गंभीर यांनी डाव सांभाळला.
वाचा-
सचिन ५४ धावा करून बाद झाला तर विराट कोहली २४ धावांवर माघारी परतला. गंभीरने ५० धावांची खेळी केली. त्यानंतर कमाल केली ती युवराज सिंगने…
वाचा-
गोलंदाजी करताना दोन विकेट घेणाऱ्या युवराजने ५७ धावांची खेळी केली आणि भारताला ४७.४ षटकात विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
भारताने हा सामना ५ विकेटनी जिंकला आणि ऑस्ट्रेलियाचा विजय रथ रोखला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times