करोना व्हायरसबरोबर लढणे म्हणजे ही तर तिसऱ्या महायुद्धासारखी स्थिती आहे, असे मत आयपीएलच्या एका संघ मालकाने व्यक्त केले आहे. सध्या आपण या परिस्थितीतून बाहेर यायला हवे, असे आवाहनही त्यांनी लोकांना केले आहे.

आज बीसीसीआय आणि आयपीएलच्या संघ मालकांची एक बैठक होणार होती. पण ही बैठक रद्द करावी लागली. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी आपले मत व्यक्त केले.

वाडिया म्हणाले की, ” सध्याच्या घडीला मी तरी आयपीएलचा विचार करू शकत नाही. कारण सध्या तिसऱ्या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमधून बाहेर कसे पडायचे तहे पहिल्यांदा पाहायला हवे, त्याचबरोबर लोकांची मदतही करायला हवी.”

संचारबंदीनंतर आता एप्रिलमध्ये आयपीएल खेळवण्यात येणार नसल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी सांगितले की, ” बीसीसीआय सध्याच्या घडीला सर्व गोष्टी पाहते आहे. त्यामुळे भारतामध्ये करोना व्हायरसमुळे कशी परिस्थिती आहे, याचे अवलोकन बीसीसीआय एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत करणार आहे. त्यानंतर आयपीएलबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येऊ शकतो. पण जर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जर आयपीएलचा पहिला सामना झाला नाही तर आयपीएल रद्द करावी लागेल.”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता आयपीएल अजून पुढे ढकलण्यात येणार आहे. बीसीसीआय एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्व गोष्टींवर नजर ठेऊन असेल. त्यामुळे सध्याच्या घडीला बीसीसीआयला आयपीएलबाब वेट अँड वॉच अशीच भूमिका घ्यावी लागणार आहे. कारण आगामी दोन आठवडे भारतीयांसाठी महत्वाचे असल्याचे अश्विननेही सांगितले आहे. त्यामुळे दोन आठवड्यांनंतर परिस्थितीमध्ये काही सुधारणा होते का, हे बीसीसीआयला पाहावे लागणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here