ऍशेस कसोटी मालिका 2021: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांमधला  (Australia Vs England) ॲशेस कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना आजपासून ॲडलेडमध्ये (Adelaide) सुरु झाला. या कसोटीच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाला त्यांचा जुना कर्णधार पुन्हा मिळाला आहे. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ॲडलेड कसोटीत कर्णधारपदाची धुरा स्टिव्ह स्मिथकडे (Steve Smith) सोपवण्यात आली आणि केपटाऊनच्या ‘त्या’ वादग्रस्त कसोटीनंतर तब्बल 45 महिन्यांनी स्मिथ नाणेफेकीसाठी मैदानात उतरला

Ashes Test Series 2021: कांगारुंचं नेतृत्व पुन्हा स्मिथकडे, साडेतीन वर्षांनी स्टिव्ह स्मिथच्या अंगावर 'ग्रीन ब्लेझर

पॅट कमिन्ससोबत काय घडलं?
ऑस्ट्रेलियाचा नियमित कसोटी कर्णधार टीम पेननं ‘ॲशेस’ सुरु होण्याच्या अवघे काही दिवस आधी वैयक्तिक आयुष्यातील एका जुन्या प्रकरणामुळे कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर  टीम पेननं आपल्यामुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम होऊ नये यासाठी मालिकेतून माघारही घेतली. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियानं नवा कर्णधार म्हणून वेगवान आणि अनुभवी गोलंदाज पॅट कमिन्सला नियुक्त केलं. कमिन्सच्या नेतृत्वात ब्रिस्बेनच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा 9 विकेट्सनी धुव्वा उडवला.

Ashes Test Series 2021: कांगारुंचं नेतृत्व पुन्हा स्मिथकडे, साडेतीन वर्षांनी स्टिव्ह स्मिथच्या अंगावर 'ग्रीन ब्लेझर

त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या कसोटीसाठी ॲडलेडमध्ये दाखल झाला. दरम्यान काल कमिन्स डिनरसाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार कमिन्सनं कोणत्याही जैव सुरक्षेचं उल्लंघन केलेलं नाही. पण या रेस्टॉरंटमधील एका व्यक्तीच्या तो निकटच्या संपर्कात आला. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कमिन्सला सात दिवसांसाठी विलगीकरणात राहावं लागणार आहे. याच रेस्टॉरंटमध्ये नॅथन लायन आणि मायकल स्टार्क हे देखील त्यावेळी उपस्थित होते. पण त्यांचा कुणाशीही जवळचा संपर्क आला नसल्याने त्यांना ॲडलेडमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली.

कमिन्स खेळणार नसल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या कसोटीसाठी उपकर्णधार असलेल्या स्मिथला कर्णधारपदी बढती दिल्याची घोषणा केली. तर ट्रेविस हेडला उपकर्णधार नियुक्त करण्यात आलं. त्यामुळे आज सकाळी तब्बल साडेतीन वर्षांनी स्टिव्ह स्मिथ ‘ग्रीन ब्लेझर’ घालून नाणेफेकीसाठी मैदानात उतरला. स्मिथच्या नेतृत्वात आतापर्यंत ऑस्ट्रेलियानं 34 पैकी 18 कसोटी जिंकल्या आहेत.

स्मिथ आणि ‘सॅन्डपेपर गेट’ प्रकरण
मार्च 2018 साली दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली केपटाऊन कसोटी गाजली ती बॉल टॅम्परिंगमुळे. ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून बॅनक्रॉफ्टनं सॅन्डपेपरचा वापर करून बॉल टॅम्परिंगचा केलेला प्रयत्न टेलिव्हिजन कॅमेऱ्यात कैद झाला. पुढे या प्रकरणात बॅनक्रॉफ्टसह कर्णधार स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरही सामील असल्याचं सिद्ध झालं. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं तातडीने यावर कारवाई करत स्मिथ आणि वॉर्नरवर एक वर्षांची बंदी घातली, तर बॅनक्रॉफ्टलाही नऊ महिन्यांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरं जावं लागलं होतं.

Ashes Test Series 2021: कांगारुंचं नेतृत्व पुन्हा स्मिथकडे, साडेतीन वर्षांनी स्टिव्ह स्मिथच्या अंगावर 'ग्रीन ब्लेझर

बंदीनंतर स्मिथचं दमदार कमबॅक
एका वर्षाच्या बंदीनंतर स्मिथला पुन्हा संघात स्थान मिळालं. 2019 साली ॲशेस मालिकेत कमबॅक करणाऱ्या स्मिथनं धावांचा रतीब घातला. या मालिकेत त्यानं 4 सामन्यात सर्वाधिक 774 धावा केल्या. त्यात एक द्विशतक,  दोन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता. स्मिथच्या या दमदार कामगिरीनं ऑस्ट्रेलियानं ॲशेस मालिकाही खिशात घातली. आणि स्मिथला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा मानाचं स्थान मिळालं.

Ashes Test Series 2021: कांगारुंचं नेतृत्व पुन्हा स्मिथकडे, साडेतीन वर्षांनी स्टिव्ह स्मिथच्या अंगावर 'ग्रीन ब्लेझर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हे देखील वाचा-

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here