नवी दिल्ली: करोना व्हायरसच्या संकटामुळे जपानची राजधानी टोकिओत होणारी ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष स्थगित करण्यात येणार आहे. जपानचे पंतप्रधान यांनी मंगळवारी ऑलिम्पिक स्पर्धा स्थगित करण्याचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांना पाठवला आहे. बाक यांनी या प्रस्तावाला होकार दिल्याचे आबे यांनी सांगितले.

वाचा-
करोना व्हायरसच्या संकटामुळे ऑलिम्पिक स्पर्धा घेता येणार नाही. स्पर्धा स्थगित करण्याशिवाय दुसरा कोणता मार्ग नाही. यासंदर्भात थॉमस बाक यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याचे आबे यांनी सांगितले. अर्थात ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षी होणार असली तरी ती या नावानेच ओळखली जाईल असे ही त्यांनी स्पष्ट केले.

वाचा-
जपानचे पंतप्रधान आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बाक यांच्यात चर्चा झाल्यानंतर टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात एकमत झाले आहे. ही स्पर्धा २०२१च्या उन्हाळ्याच्या आधी घेतली जाईल. ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू आणि अन्य सर्व गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे IOC आणि टोकिओ ऑलिम्पिक समितीने एकत्र प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याआधी ठरलेल्या नियोजनानुसार २४ जुलै ते ९ ऑगस्ट या काळात ऑलिम्पिक स्पर्धा होणार होती. पण करोना व्हायरसमुळे ऑलिम्पिकच्या आयोजनावर संकट उभे होते. दोन दिवसांपूर्वी कॅनडा आणि नंतर ऑस्ट्रेलियाने ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेण्याची घोषणा केली होती.

वाचा-

इतिहासात प्रथमच…
ऑलिम्पिक खेळाच्या इतिहासात प्रथमच स्पर्धा स्थगित करण्याची ही वेळ आहे. याआधी १९१६, १९४० आणि १९४४ मध्ये महायुद्धामुळे ऑलिम्पिक स्पर्धा झाली नव्हती.

ऑलिम्पिक स्पर्धेसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी होता. पण त्याआधीच पंतप्रधान आबे यांच्या घरी कॅबिनेटची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला कळवण्यात आला.

स्पर्धा एक वर्षासाठी स्थगित करण्यावर बाक १०० टक्के सहमत झाल्याचे आबे यांनी सांगितले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here