गांगुली यावेळी थेट पैशांची मदत वंचितांना करणार नाही, तर लॉकडाऊनमधील वंचितांना गांगुली मदतीचा हात देताना दिसणार आहे. गांगुलीने याबाबत स्वत: खुलासा केलेला नसला तरी बंगाल क्रिकेट संघाच्या एका पत्रकात ही घोषणा करण्यात आली आहे.
गांगुली लॉकडाऊनमधील वंचितांना ५० लाख रुपयांचे तांदूळ वाटणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही लोकांना बंगालमध्ये शाळेत ठेवण्यात आले आहे. या लोकांना गांगुलीने मदत करायचे ठरवले आहे. गांगुलीने लाल बाबा चावल या कंपनीबरोबर ही गोष्ट करायचे ठरवले असून त्यासाठी गांगुली ५० लाख रुपयांची मदत करणार आहे.
लाल बाबा चावल या कंपनीने म्हटले आहे की, ” गांगुलीने लॉकडाऊनमधील वंचितांना मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. गांगुलीचे हे पाऊल अन्य लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
करोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण आहे. करोना व्हायरसचा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे. पण खेळाडूंमध्ये खेळभावना असते, त्यामुळे सकारात्मक विचार करत असतात. आता भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाचेच घ्या ना. सध्याच्या घडीला भारतामध्ये २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण ती समाजातील काही घटकांसाठी पुढे सरसावली असून त्यांना सानियाने मदतीचा हात पुढे केला आहे. रोजंदारीवर असलेल्या कामगारांसाठी ती सध्या एक पुण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक रोजंदारी कामगाराला सानिया आपल्या चळवळीच्या माध्यमातून दोन किलो तांदूळ, दोन किलो गव्हाचे पीठ, दोन किला डाळी, अर्धा किलो साखर, ५०० मिली. तेल, १०० ग्रॅम चहा पावडर, एक किलो मीठ आणि दोन साबण, असे पॅकेट तिने बनवले असून रोजंदारीवर असलेल्या कामगारांना ती देत आहे.
करोनाग्रस्तांसाठी बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी आपला पगार सरकार देणार असल्याचे जाहीर केले आहे. आपला एका महिन्याचा अर्धा पगार बांगलादेशचे २७ खेळाडू सरकारला करोनाग्रस्तांसाठी देणार आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times