भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतला भारतीय संघाकडून बऱ्याच संधी मिळाल्या. पण या संधीचे सोने मात्र त्याला करता आले नाही. ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूच्या मते पंतने स्वत:ची ओळख निर्माण करायला हवी, पण त्याचवेळी कोणाचीही कॉपी करू नये, असे म्हटले आहे.

इंग्लंडमधील विश्वचषकात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला तळाच्या फळीत पाठवून पंतला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले गेले. पण त्यामध्येही तो अपयशी ठरला. त्यापूर्वी आणि विश्वचषकानंतरही पंतला भारतीय संघाने बरीच संधी दिली. पण तो त्यामध्ये अपयशी ठरताना दिसला. संघाला गरज असताना आपली विकेट बहाल करताना पंत बऱ्याचडदा दिसला. त्यामुळेच सध्याच्या घडीला त्याचे भारतीय संघातील स्थान डळमळीत आहे.

गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाचा माजी महान यष्टीरक्षक आणि फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने पंतबाबत स्पष्ट वक्तव्य केले होते. गिलख्रिस्ट म्हणाला होता की, ” पंतने महेंद्रसिंग धोनीची नक्कल करू नये. पंतकडे चांगली गुणवत्ता आहे. त्यावर त्याने मेहनत घेतली तर तो जास्त काळ क्रिकेट खेळू शकतो.”

ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिननेही पंतबाबत म्हटले होते की, ” पंत हा गुणी खेळाडू आहे. पण त्याने दुसऱ्याच कोणाची नक्कल न करता आपली स्वत:ची ओळख निर्माण करावी.”

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगला एका चाहत्याने प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर हॉग म्हणाला की, ” मला तर पंतची बॅटींग आवडते. तो जेव्हा खेळायला येतो तेव्हा मी टीव्ही लावतो. पंतकडे चांगली गुणवत्ता आहे, पण सध्याच्या घडीला त्याला मानसीक आधार देणाऱ्या प्रशिक्षकाची गरज आहे. त्यामुळे त्याला जर चांगला मानसीक आधार मिळाला तर तो नक्कीच चांगली कामगिरी करू शकतो.”

सध्याच्या घडीला ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताचे यष्टीरक्षण कोण करणार, यावर बरीच चर्चा सुरु आहे. या स्पर्धेवर धोनीचे भवितव्य अवलंबून असेल. धोनीला जर या स्पर्धेत संधी दिली नाही तर त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपुष्टात येईल, असे म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here