सध्याच्या घडीला भारत २१ दिवसांसाठी लॉकडाऊन आहे. त्यामुळे जवळपास सर्वच जणं घरी बसलेले आहेत. पण काही लोकं तरीही बाहेर फिरत आहेत. पोलीस त्यांच्यावर कारवाई करत आहेत. पण अशा लोकांची संख्या वाढली तर त्यांना नेमके ठेवायचे कुठे, हा प्रश्न यंत्रणेलाही पडला आहे. सध्याच्या घडीला यावर एक जालीम उपाय शोधून काढला आहे. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू खेळलेल्या या स्टेडियमचे सध्या जेलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे कैद्यांच्या जागेचा प्रश्न सुटणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देखील काही लोक घराबाहेर पडत आहेत. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. करोना व्हायरसची लागण पसरण्यापासून रोखण्यासाठी हे दिवस फार महत्त्वाचे आहेत. मोदीं पाठोपाठ अनेक जण लोकांना घरीच राहण्याचे आवाहन करत आहेत. यात राजकीय नेते, अभिनेते आणि आजी-माजी क्रिकेटपटूंचा समवेश आहे. पण तरीही काही लोकं ऐकत नसून त्यांचे आता काय करायचे, हा मोठा प्रश्न पडलेला आहे.

ज्या मैदानात भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव, २००७ आणि २०११ या दोन्ही विश्वविजयात मोलाचा वाटा उचलणारे युवराज सिंग आणि हरभजन सिंग ज्या चंदिगढच्या मैदानात खेळले आहेत, त्या मैदानाचे आता जेलमध्ये रुपांतर करण्याचे ठरवले आहे. या स्टेटियमची क्षमता २० हजार प्रेक्षक बसू शकतील, एवढी आहे. त्याचबरोबर हे स्टेडियम १५.३२ एकरांमध्ये आहे. हे मैदान चंदिगढ येथील सेक्टर १६ येथे आहे.

याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, ” आम्ही चंदिगढ येथील सेक्टर-१६ मधील क्रिकेट स्टेडियमचे रुपांतर जेलमध्ये केले आहे. कर्फ्यू असताना जे लोकं नियम मोडतील त्यांना आम्ही या जेलमध्ये ठेवणार आहोत.”

सरकार आणि डॉक्टर सर्वांना घरी राहण्यास सांगत आहेत. तरी मी असे ऐकतोय की काही लोक ही गोष्ट गंभिर्याने घेत नाहीत. यासंदर्भातील काही व्हिडिओ देखील मी पाहिले ज्यात काही जण क्रिकेट खेळत आहेत. सर्वांना या काळात खेळण्याची आणि मित्रांना भेटण्याची इच्छा होत असेल. पण ही गोष्ट देशासाठी प्रचंड धोक्याची आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनला सुट्टी समजण्याची चुक तुम्ही करू नये, असे सचिनने म्हटले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here