वाचा-
येत्या काही महिन्यात होणारी आशिया कप स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. आशियाई क्रिकेट काउंसिलची या स्पर्धे संदर्भातील बैठक अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. ACC कडून आशिया कपचे आयोजन केले जाते. नियोजित वेळेनुसार ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात होणार होती. पण सध्याच्या परिस्थितीत स्पर्धा होईल असे वाटत नाही. पुढील आशिया कप स्पर्धा कधी आणि कुठे घेण्यासंदर्भात ACCची बैठक हणोर होती, पण ही बैठक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
वाचा-
या वर्षी आशिया कप स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटू कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात खेळणार नाहीत अशी भूमिका घेतली होती. भारताच्या या भूमिकेवर पीसीबी आणि एसीसीला माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत एसीसीकडे दोनच पर्याय शिल्लक राहतात एक म्हणजे भारताशिवाय ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये घ्यायची किंवा भारतासह स्पर्धेचे ठिकाण बदलून दुबईत त्याचे आयोजन करायचे.
वाचा-
या संदर्भातच एसीसीची बैठक २९ मार्च रोजी होणार होती. पण ही बैठक करोनामुळे स्थगित करण्यात आली आहे. या बैठकीच्या आधी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळू शकतो. पण स्पर्धा अन्य ठिकाणी झाली पाहिजे. पाकिस्तानसाठी बाब मोठा झटका देणारी आहे. पाक बोर्डाला देशात पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू करायचे आहे. त्यामुळेच त्यांना आशिया कप स्पर्धा पाकिस्तानमध्ये व्हावी अशी इच्छा आहे.
क्रीडा विश्वातील या बातम्या मिस करू नका
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times