२१ दिवस देशात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून अनेक लोक घरात आहेत. त्याचबरोबर करोना बाधितांची संख्याही वाढत आहे. सरकार आणि यंत्रणा यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. पण त्यासाठी त्यांना मदत निधीची गरजही लागू शकते. यासाठी धवनने एक पाऊल पुढे उचलले आहे. धवनने काही रक्कम पंतप्रधान सहाय्यक निधीला दिलेली आहे. त्यामुळे आता देश संकटात असताना लोकांनीही पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन धवनने केले आहे.
धवनने ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडीओ देशवासियांसाठी पोस्ट केला आहे. यामध्ये धवन म्हणाला आहे की, ” तुम्ही सर्व जण घरात राहा आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. मी एक छोटीशी रक्कम पंतप्रधान सहाय्यक निधीसाठी मदत म्हणून दिली आहे. मी तुम्हालाही आवाहन करतो की, देशासाठी तुम्हीही सहाय्य करावे.”
भारताचा धडाकेबाज सलामीवीर
करोना व्हायरसमुळे घरी आहे. पण घरात त्याला पत्नीने हैरण केले आहे. घरी असलेल्या शिखरला पत्नी कपडे धुवण्यास आणि वॉशरूम साफ करण्याची कामे लावत आहे.
वाचा-
मैदानावर गब्बर नावाने ओळखला जाणारा शिखरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. घरी एक आठवडा राहिल्यामुळे काय काय करावे लागू शकते असे शिखरने या व्हिडिओत दाखवले आहे. व्हिडिओत शिखर कपडे धुवत आणि वॉशरूम साफ करताना दिसत आहे.
वाचा-
या व्हिडिओत शिखरची पत्नी आयशा त्याला काम करण्याचे ऑर्डर देत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना हिंदी चित्रपटातील ‘जब से हूई है शादी…’ हे गाणं जोडले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times