पहिल्या दिवशी भारताने ३ बाद २७२ धावा केल्या होत्या, यात केएल राहुलच्या नाबाद १२२ आणि अजिंक्य रहाणेच्या नाबाद ४० धावांचा समावेश आहे. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागिदारी केली आहे.
वाचा-पावसाने मुड ऑफ केला तरी भारताला विजयासाठी संधी; फक्त ही एक गोष्ट करावी लागले
असे असेल तिसऱ्या दिवसाचे हवामान
सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट्स मैदानावर सोमवारी टप्प्या टप्प्याने पाऊस पडत होता त्यामुळे मैदान सूखले नाही. आज मंगळवारी देखील ढगाळ हवामान असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एक्यू वेदर डॉट.कॉमने दिलेल्या अंदाजानुसार तापमान २७ डिग्री सेल्सियस असेल. हवा थंड असेल आणि वारे देखील असेल. अधून मधून उन देखील येण्याची शक्यता आहे. पण दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असे. दिवसभरात पावसाची शक्यता नसल्याचा या अंदाजात म्हटले आहे.
वाचा- इंग्लंडने नांगी टाकली; तिसरी कसोटी ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि १४ धावांनी जिंकली
कधी सुरू होणार तिसऱ्या दिवसाच खेळ
दुसरा दिवस वाया गेल्याने आता तिसऱ्या दिवसाचा खेळ नियोजित वेळेनुसार सुरू होणार आहे. आजच्या दिवसाच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सत्रात अर्ध्या तासाचा अतिरिक्त खेळ होईल. काल वाया गेलेल्या खेळाची थोडीफार भरपाई आज करण्याची योजना होती. त्यानुसार ९० ऐवजी ९८ षटकांचा खेळ खेळायचा विचार होता. पण खराब प्रकाशामुळे शक्य होईल असे वाटत नाही. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी पाऊस होण्याची शक्यता आहे. असे झाले तर या सामन्यात फक्त अजून दोन दिवसांचा खेळ होईल.
वाचा- भारताच्या खेळाडूच्या नावावर झाला लाजिरवाणा विक्रम; आणखी किती संधी देणार?
आज तिसऱ्या दिवशी सर्वांना प्रतिक्षा असेल तरी राहुलच्या द्विशतकाची आणि अजिंक्यच्या शतकाची होय. अजिंक्यने गेल्या २२ डावात शतक केले नाही. २०२१ मध्ये तो ८ वेळा सिंगल डिजिटमध्ये बाद झाला आहे. तर राहुलकडून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पहिले द्विशतक व्हावे अशी सर्वांची इच्छा असेल. भारताच्या एकाही फलंदाजाने दक्षिण आफ्रिकेत द्विशतक केले नाही. सचिन तेंडुलकरने १९९७ साली केपटाऊन कसोटीत १६९ धावा केल्या होत्या. भारतीय फलंदाजाकडून झालेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times