ऑकलंड: करोनामुळे संपूर्ण जग संकटात अडकले आहे. जगभरातील ३ अब्ज लोकांना घरी थांबावे लागले आहे. अशात काही खेळाडूंचा समावेश आहे. एका क्रिकेटपटूला तर पत्नी आणि मुलापासून दूर रहावे लागले आहे. आता त्याची धडपड कुटुंबाला भेटण्यासाठीची आहे.

वाचा-
न्यूझीलंडचा माजी जलद गोलंदाज सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. इयानचे कुटुंबीय ब्रिटनमध्ये आहेत आणि तो न्यूझीलंडमध्ये आहे. ब्रायनकडे ब्रिटनला जाण्या इतके पैसे नाही. त्यामुळे आता पैसे मागण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.

वाचा-
करोना व्हायरसमुळे युरोपमधील अनेक देशात भीतीचे वातावरण आहे. ब्रिटनमध्ये देखील करोनाचे रुग्ण आढळले आहेत आणि काहींचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत ब्रायनला कुटुंबाला भेटायचे आहे. ब्रिटनला जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्याने ट्विटकरून मदत मागितली आहे.

वाचा-

वाचा- होणार

ब्रायनने लोकांकडून पैसे मागितले असेल तरी त्याला ते फुकट नको आहेत. न्यूझीलंडकूडन २२ कसोटी आणि १० वनडे खेळणाऱ्या ब्रायननने क्रिकेटवर बोलण्याची तयारी दाखवली आहे. याबदल्यात त्याला पैसे हवे आहेत. व्हिडिओ कॉलद्वारे तो क्रिकेटबद्दल बोलणार असून त्याबदल्यात मिळणाऱ्या पैशांतून तो ब्रिटनला जाणार आहे. ब्रायनची पत्नी आणि दोन लहान मुले ब्रिटनमध्ये आहेत.

वाचा-

करोना व्हायरसच्या धोक्यामुळे क्रिकेटचे सामने आणि अन्य क्रीडा स्पर्धा बंद आहेत. न्यूझीलंड संघाचा देखील ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्ध्यावरच रद्द केला होता. या दोन्ही संघातील पहिला सामना प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात आला होता. पण त्यानंतर सर्व खेळाडू मायदेशात परतले.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here