करोना व्हायरसमुळे जगभरात सर्वांचेच मोठे नुकसान झाले आहे. सध्याच्या घडीला देशामध्ये करोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळेच सध्याच्या घडीला करोना व्हायरस झाल्यावर नेमके काय करायचे, हे महत्वाचे ठरले आहे. करोना व्हायरस हाताळणारे सवात चांगले परीक्षक कोण आहेत, हे भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सांगितले आहे.

सचिनने एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिनने करोना व्हायरसबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. या व्हिडीओमध्येच त्याने हा करोना व्हायरस कोण उत्तम पद्धतीने हाताळू शकतो, हेदेखील सांगितले आहे.

सचिनने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, ” करोना व्हायरस योग्यपद्धतीने हाताळण्यासाठी दोन सर्वोत्तम परीक्षक आपल्याकडे आहेत. हे दोन परिक्षक म्हणजे डॉक्टर्स आणि सरकार. त्यामुळे सरकार आणि डॉक्टर्स ज्या गोष्टी सांगत आहेत त्या गोष्टींचे पालन आपण करायलाच पाहिजे. आपल्या हितासाठीच या गोष्टी सांगितल्या जात आहेत.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देखील काही लोक घराबाहेर पडत आहेत. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. करोना व्हायरसची लागण पसरण्यापासून रोखण्यासाठी हे दिवस फार महत्त्वाचे आहेत. मोदीं पाठोपाठ अनेक जण लोकांना घरीच राहण्याचे आवाहन करत आहेत. यात राजकीय नेते, अभिनेते आणि आजी-माजी क्रिकेटपटूंचा समवेश आहे.

सरकार आणि डॉक्टर सर्वांना घरी राहण्यास सांगत आहेत. तरी मी असे ऐकतोय की काही लोक ही गोष्ट गंभिर्याने घेत नाहीत. यासंदर्भातील काही व्हिडिओ देखील मी पाहिले ज्यात काही जण क्रिकेट खेळत आहेत. सर्वांना या काळात खेळण्याची आणि मित्रांना भेटण्याची इच्छा होत असेल. पण ही गोष्ट देशासाठी प्रचंड धोक्याची आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनला सुट्टी समजण्याची चुक तुम्ही करू नये, असेही सचिनने म्हटले होते.

पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अनेक लोक त्याचे पालन करत नाहीत. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नाराजी व्यक्त केली आहे. सचिनने लॉकडाऊनचे पालन करण्यासंदर्भात एक ताजा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here