IND वि SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. मालिकेतील हा दुसरा सामना भारताने जिंकल्यास भारत पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या भूमित कसोटी मालिका जिंकेल. दरम्यान या महत्त्वाच्या कसोटी भारताचा कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे संघाबाहेर असला तरी युवा फलंदाज केएल राहुलला कर्णधारपद मिळाल्याने एक नवा कसोटी कर्णधार भारताला मिळाला आहे. राहुल हा 34 वा भारतीय कसोटी कर्णधार आहे.

विशेष म्हणजे तब्बल 13 वर्षानंतर कर्नाटकच्या खेळाडूला भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद मिळालं आहे. याआधी 1980 मध्ये गुंडप्पा विश्वनाथ यांनी 2 कसोटी सामने, तर 2003 ते 2007 पर्यंत राहुल द्रविडने 25 कसोटी सामने आणि 2007 ते 2008 मध्ये अनिल कुंबळेने 14 कसोटी सामन्यात भारताचं कर्णधारपद भूषवलं होतं. त्यानंतर आता चौथ्यांदा केएल राहुलच्या रुपात कर्नाटकच्या खेळाडूला हा सन्मान मिळाला आहे. दरम्यान कर्णधारपद मिळताच केएल राहुलने ‘ही फार आनंदाची गोष्ट असून प्रत्येक खेळाडूचं हे स्वप्न असतं’ असंही म्हणाला आहे.

विनोद कांबळीकडून कौतुक

राहुलला ही जबाबदारी मिळताच अनेकांनी त्याच अभिनंदन केलं असून भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने देखील राहुलचं कौतुक केलं आहे.  कांबळी म्हणाला, ‘प्रत्येक खेळाडूचं भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होण्याचं स्वप्न असतं पण फार कमी जणांना ही संधी मिळते. तेही परदेशात ही संधी मिळाल्याने त्याने लवकरच त्याने चांगल्या कामगिरीने पूर्ण वेळासाठी कर्णधार बनावं.’

हे ही वाचा –

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here