मुंबई: स्पर्धा नंतर देखील होऊ शकते. आता लोकांचा जीव महत्त्वाचा आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. देशात करोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनला रोहितने पाठिंबा देत लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे.

संपूर्ण देशाने याआधी कधीच न अनुभवलेल्या परिस्थितीतून जात आहे. सर्व सामान्य जनतेपासून ते खेळाडू घरीच थांबले आहेत. क्रिकेटसह अन्य खेळातील खेळाडू घरीच थांबून लोकांना सोशल मीडियावरून आवाहन करत आहेत. यात भारताचा कर्णधार विराट कोहली, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवागसह अन्य खेळाडूंचा समावेश आहे.

वाचा-
बीसीसीआयने देखील करोनाचा धोका लक्षात घेऊन आयपीएलसह सर्व स्पर्धा स्थगित केल्या आहेत. यासंदर्भात बोलताना रोहितने वाट पाहू शकते पण सध्या या संकटापासून वाचणे अधिक गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

वाचा-
भारताचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल सोबत इस्टाग्रामवर बोलताना रोहितने आयपीएलच्या आयोजनापेक्षा करोनाचा धोका मोठा असल्याचे सांगितले. आपल्या सर्वांना आधी देशाचा विचार केला पाहिजे. सध्या जी परिस्थिती आहे त्यात सुधारणा झाल्याशिवाय आपण आयपीएलवर बोलू शकत नाही. आधी आपले आयुष्य सामान्य होऊ दे, असे रोहित म्हणाला.

वाचा-
संपूर्ण देशात मुंबईसारखी परिस्थिती आहे. मी याआधी मुंबईला अशा परिस्थितीत कधीच पाहिले नाही, असे रोहितने सांगितले.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत जखमी झाला होता. त्यानंतर तो मैदानापासून दूर झाला. रोहित शिवाय वनडे आणि कसोटी मालिकेत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here