मुंबई: ऑस्ट्रेलियात यंदा स्पर्धा होणार आहे. करोना व्हायरसचा धोका या स्पर्धाला सुद्धा आहे. सध्याच्या परिस्थितीत आयसीसीने पात्रता फेरीतील सर्व सामना स्थगित केले आहे. करोना रुग्णांची संख्या कमी झाली तर ही स्पर्धा नियोजित वेळेत होईल असे आयसीसीने म्हटले आहे. अन्य खेळांप्रमाणे क्रिकेट विश्वात शांतता असली तरी आयसीसी सोशल मीडियावर चाहत्यांसाठी सक्रीय आहे. आयसीसीने गेल्या म्हणजे २०१६ साली झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमधील विराट कोहलीच्या धमाकेदार खेळीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

वाचा-
आजच्या दिवशी म्हणजेच २०१६ मध्ये विराट कोहलीने टी-२० मधील सर्वात शानदार अशी खेळी केली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनलमध्ये जाण्यासाठीची ही लढत होती. मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ६ बाद १६० धावा केल्या होत्या.

वाचा-
भारताची सुरुवात फार वेगाने झाली नाही. शिखर धवन आणि रोहित शर्मा हे लवकर बाद झाले. भारताची अवस्था ७.५ षटकात ३ बाद ४९ अशी होती. तेव्हा भारताची आशा फक्त एका खेळाडूवर होती तो म्हणजे होय.

वाचा-
विराटने युवराज सिंग सोबत चौथ्या विकेटसाठी ४५ धावांची भागिदारी केली. युवी बाद झाला तेव्हा भारताला ६ षटकात ६६ धावांची गरज होती. याचा अर्थ भारताला प्रत्येक षटकात ११ धावांची गरज होती. मोहालीच्या या खेळपट्टीवर ही सोपी गोष्ट नव्हती.

वाचा-

कोहली सोबत मैदानावर महेंद्र सिंह धोनी होता. या कर्णधार आणि उपकर्णधार जोडीने चौकार-षटकाराच्या ऐवजी वेगाने धावा घेत धावफलक पुढे नेला. अखेरच्या ३ षटकात भारताला ३९ धावा हव्या होत्या.

वाचा-
ऑस्ट्रेलियाकडून जेम्स फॉकनरने १८वे षटक टाकले. विराटने फॉकनरच्या या षटकात १९ धावा केल्या. अखेरच्या २ षटकात २० धावांची गरज असताना विराटने कमाल केली आणि भारताला सेमीफायनलमध्ये जागा मिळवून दिली. सामन्यात विराटने ५१ चेंडूत ८२ धावा केल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here