नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. भारतात देखील २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सर्व सामान्य जनतेपासून ते क्रीडा क्षेत्रातील खेळाडू आपआपल्या घरी थांबले आहेत. भारताला पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणारे कर्णधार यांनी देखील लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण मानवासाठी घरी राहणे गरजेचे असल्याचे देव यांनी म्हटले आहे.

वाचा-
लॉकडाऊन दरम्यान लोकांनी घरी थांबावे. तर तुम्ही या व्हायरसपासून स्वत:चा बचाव करू शकता. यामुळे जगभरात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. या लॉकडाऊनकडे सकारात्मक पद्धतीने पहावे. घराच्या आत देखील एक जग आहे. ते म्हणजे तुमचे कुटुंब होय. पुस्तके, टीव्ही, संगीत अशी अनेक मनोरंजनाची साधने तुमच्याकडे आहेत. कुटुंबासोबत वेळ घालवणे यासारखी चांगली गोष्ट नाही, असे देव यांनी सांगितले.

वाचा-
कपील देव देखील सध्या घरीच आहेत. या काळात स्वत: घरच्यांसाठी जेवण करत आहेत. त्याच बरोबर साफसफाई आणि झाडांची काळजी घेण्याचे काम कपील स्वत: करत आहेत. माझ्या घरी एक छोटी बाग आहे. एक छोटा गोल्फ कोर्स देखील आहे. आता कुटुंबासोबत वेळ मिळत आहे. ज्यांना मी इतक्या काळापासून मिस करत आहे, असे देव म्हणाले.

वाचा-
इंग्लंडमध्ये खेळत असताना मी जेवण तयार करण्यास शिकलो होते. आता मोकळा वेळ असल्यामुळे मी सर्वांना सुट्टी दिली आहे आणि सर्वांसाठी जेवण तयार करतो. या कठीण काळात लोकांनी जबाबदार व्हावे. स्वच्छता राखावी, असे देव यांनी सांगितले.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here