न्यूयॉर्क: मॉडेल () शनिवारी रात्री तिच्या मित्रांसोबत पार्टीचे नियोजन करत होती. तेव्हा तिच्या फोनवर मेसेज येऊ लागले. हे मेसेज पाठवणारा दुसरा कोणी नसून अमेरिकन फुटबॉल स्टार खेळाडू होता. अँटोनियो ब्राउन हा मॉडेल अवाला हॉटेलमध्ये बोलावत होता. सुरुवातीला अवाने जाण्यास नकार दिला, पण नंतर रात्री उशिरा ती तिथे पोहोचली, त्यानंतर घडलेल्या प्रकाराने संपूर्ण क्रीडाविश्व ढवळून निघाले आहे.

अवा लुईस ही अडल्ट वेबसाइट ओन्ली फॅन्स (Onlyfans) ची मॉडेल आहे. डेलीमेलला दिलेल्या मुलाखतीत अवाने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. तसेच ब्राऊनवर जाणूनबुजून कोरोना विषाणू पसरवल्याचा आरोप केला. अवा लुईसच्या म्हणण्यानुसार, त्या रात्री हॉटेलमध्ये दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले होते. अँटोनियो ब्राउनला हे क्षण कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायचे होते, आणि ते त्याने केले. ब्राउनची ही मागणी ऐकून अवाला आश्चर्य वाटले होते. आता हे सर्व फुटेज डेली मेलकडेही आहेत.
सध्या जगभरात कोरोनाची तिसरी लाट वेगाने पसरत चालली आहे. अशा परिस्थितीत अँटोनियो ब्राउनशी संबंधित असलेल्या नॅशनल फुटबॉल लीग (NFL League) ने देखील खेळाडूंसाठी एक बायो-बबल तयार केला आहे. जेणेकरून खेळाडू कोणत्याही बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये, अशी खबरदारी घेतली जात आहे. असे असतानाही, अँटोनियो ब्राउनने अडल्ट मॉडेल अवा लुईसची एका हॉटेलमध्ये भेट घेतली आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केले.

एवढंच नाही, तर नवीन वर्षाच्या एक दिवस आधी या दोघांमधील गप्पाचे स्क्रीनशॉटही समोर आले आहेत. अॅडल्ट मॉडेल अवाने हे सर्व चॅट फोटोंसह मीडियामध्ये व्हायरल केले आहे. २३ वर्षीय मॉडेल अवा लुईस पहिल्यांदाच ३३ वर्षीय खेळाडूला भेटली होती. गेल्या चार वर्षांपासून दोघेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी संवाद साधत होते. पण फक्त एका चुकीमुळे आता ही गोष्ट सार्वजनिक झाली आहे. त्यामुळे आता ही गोष्ट सर्वांसमोर उघड झाली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here