आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाचे अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होनेही करोनावर एक गाणे काढले होते. त्यानंतर आता राजस्थान रॉयल्सच्या इश सोढीने एक भन्नाट गाणं आयपीएलवर तयार केले आहे.
न्यूझीलंडचा फिरकीपटू इश सोधीने करोनावर एक गाण तयार केलं आहे आणि सध्याच्या घडीला ते चांगलंच वायरल झालेले पाहायला मिळत आहे.
सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे जगाला हादरा बसला आहे. पण करोना व्हायरसमुळे अंदाज बऱ्याच दिवसांपूर्वी आला होता, असा खुलासा भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला आहे.
याबाबत शास्त्री म्हणाले की, ” सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच घरी आहेत. हा वेळ खेळाडूंसाठी महत्वाचा आहे. कारण त्यांना या काळात चांगली विश्रांती मिळेल. त्याचबरोबर त्यांनी देशाला करोना व्हायरसबद्दल जागृकता करणेही गरजेचे आहे.”
शास्त्री यांना ‘करोना’चा अंदाज कधीपासून आला होता
याबाबत शास्त्री यांनी म्हटले आहे की, ” आम्ही न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होतो. हा दौरा संपल्यावर आम्हाला भारतात यायचे होते. त्यावेळी आम्हाला सिंगापूरहून भारतामध्ये आणण्यात आले, तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली होती. पण त्यावेळी आम्हाला ‘करोना’चा अंदाज आला नव्हता. पण जेव्हा आम्ही भारतात आलो आणि दक्षिण आफ्रिकेबरोबर मालिका खेळण्यासाठी सज्ज झालो तेव्हा कानावर काही गोष्टी येत होत्या. जेव्हा ही मालिका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा आम्हाला ‘करोना’चा अंदाज आला होता.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times