करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन आहे. पण या लॉकडाऊनमध्येही मुंबईचे स्पिरीट पाहायला मिळाले आहे. मुंबईच्या क्रिकेट वर्तुळाने हे स्पिरीट दाखवले आहे. सध्याच्या घडीला मुंबईत एकही सामना होताना दिसत नाही. पण आजपर्यंत क्रिकेटसाठी झटणाऱ्या पण ज्यांचे आपल्या हातावर पोट आहे. रोजंदारीवर जे क्रिकेटसाठी आपला घाम गाळतात, त्यांच्यासाठी मुंबई क्रिकेट सरसावले आहे.
मुंबई क्रिकेट लीग ही स्पर्धा खेळवली जाते. यामध्ये आठ संघांचा सहभाग असतो. या आठही संघांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत ग्राऊंडस्टाफला करायचे आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला आठ लाख रुपयांची मदत या ग्राऊंडस्टाफला मुंबई लीगकडून करण्यात येणार आहे.
याबाबत मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले की, ” आमच्या मैदानातील जे ग्राऊंड्समन असतात, त्यांच्याकडे उत्पन्नाचे क्रिकेट हे एकमेव साधन असते. त्याचबरोबर ते रोजंदारीवर काम करत असतात. सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे त्यांचे काम थांबले आहे आणि त्यांचे उत्पन्नही थांबले आहे. त्यांच्यावर वाईट वेळ येऊ नये यासाठी मुंबई क्रिकेट लीगच्या आठही संघांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत त्यांच्यासाठी केली आहे. याबाबतचे पत्रही त्यांनी आम्हाला दिले आहे.”
करोना व्हायरसमुळे सर्व हैराण झाले आहेत. सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे जगाला हादरा बसला आहे. करोना व्हायरसमुळे क्रीडा क्षेत्रलाही मोठा धक्का बसला आहे. ऑलिम्पिकसारखी स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर भारतातील क्रिके मालिका रद्द करण्यात आली. आयपीएलही पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला क्रिडा क्षेत्रालाही मोठा फटका फसला आहे. पण तरीही क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती करोना व्हायरसमुळे त्रस्त असलेल्या लोकांसाठी पुढे आल्याचे पाहायला मिळत आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times