सध्याच्या घडीला भारतामध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू शकत नाही. पण तरीही २९ मार्चपासून तुम्ही आयपीएलचा थरार पाहू शकता. आता हे ऐकल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण असे घडणार मात्र आहे.

यंदाच्या वर्षी आयपीएलला २९ मार्चपासून सुरुवात होणार होती. पण करोना व्हायरसमुळे ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली गेली. त्यामुळे आता यंदा आयपीएल होणार की नाही, याबाबतत संदिग्धता होती. पण आता तुम्हाला आयपीएलचा थरार २९ मार्चपासून पाहता येणार आहे.

आयपीएलचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांना आयपीएल प्रसारण करणाऱ्या चॅनेलने खूष खबर दिली आहे. या चॅनेलने आतापर्यंतचे सर्वात रोमांचकारक ५० सामने शोधून काढले आहेत. या ५० सामन्यांचे प्रसार ते २९ मार्चपासून सुरु करणार आहेत. आता या ५० महत्वाच्या सामन्यांमध्ये कोणते सामने असतील, हे पाहणे चाहत्यांसाठी पर्वणीचे ठरणार आहे.

क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत टी-२० क्रिकेट लीग या वर्षी २९ मार्चपासून सुरू होणार होती. पण करोना व्हायरसमुळे ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. आयपीएल जेव्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा असे वाटले की करोनाच्या परिस्थिती सुधारणा झाल्यानंतर याचे आयोजन होईल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू होणार नाही यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते आहे. पण रोहिला मात्र यंदा आयपीएल होणार असे वाटत आहे.

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने रोहितची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये केव्हिनने रोहितला यंदाची आयपीएल होणार की नाही, असा प्रश्न विचारला होता.

यंदाच्या आयपीएलबाबत रोहित म्हणाला की, ” यंदाची आयपीएल स्पर्धा होऊ शकते. पण हे सारे परिस्थितीवर अवलंबून आहे. जर परिस्थिती लवकर सुधारली तर आयपीएल खेळवले जाऊ शकते. पण परिस्थिती कधी सुधारेल, हे आपण सांगू शकत नाही.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here