शाहरुखला भारतीयांनी प्रेम दिले. त्यामुळेच त्याचे सिनेमे जगभरात हिट झाले. त्याचबरोबर भारताच्या आयपीएलमध्ये त्याने कोलकाता नाइट रायडर्स नावाचा संघही विकत घेतला. शाहरुखची जन्मभूमी आणि कर्मभूमी ही भारत आहे. त्यामुळे अशा संकटकाळी त्याने भारतीयांच्या पाठिशी उभे राहायला हवे, असे चाहत्यांना वाटते. पण शाहरुख सध्याच्या घडीला दुबईकरांसाठी आवाहन करताना दिसत आहे.
दुबई मीडिया ऑफीस या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख दुबईवासियांसाठी आवाहन करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
या व्हिडीओमध्ये शाहरुख़ने म्हटले आहे की, ” आपण सारे पाहत आहोत की, जगभरातील बऱ्याच देशांमध्ये, शहरांमध्ये लॉकडाऊन केले जात आहे. त्यामुळे दुबईच्या बंधू-भगिनींसाठी माझी एक विनंती आहे की, आता तुम्हीदेखील कामावर जाऊ नका. आपल्या घरातच राहा. मैदाने, हॉटेल्स आणि समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नका. आपल्या इमारतीमध्येही शेजारी किंवा मित्रांना भेटला नाहीत तर ते उपयुक्त ठरेल. करोनाला पराभूत करण्यासाठी आपल्याकडे यापेक्षा चांगला दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे जेवढी लोकं दुबईमध्ये आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की, तुम्ही तुमच्या घरातच राहा. सर्व अत्यावश्यक सेवा तुम्हाला पुरवण्यात येतील. त्यामुळे घाबरून जाऊ नका, चिंता करू नका. मी आशा करतो की, तुम्ही या सर्व गोष्टींचे पालन कराल आणि सुरक्षित राहाल.”
शाहरुखचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओचे पडसाद भारतामध्येही उमटायला सुरुवात झाली आहे. काही चाहत्यांनी तर शाहरुख भारत सरकारला कधी मदत करणार, असा सवालही विचारत आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times