सध्याच्या घडीला जगभरातील क्रीडा संघटना किंवा खेळाडू हे करोनाग्रस्तांना मदत करण्यासााठी पुढे सरसावलेले दिसत आहे. पण पैशांची खाण असलेली बीसीसीआयने मात्र याबाबत एकही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला बीसीसीआय चांगलीच ट्रोल होत आहे. #ShameOnBCCI असं म्हणत भारतीय बीसीसीआयला ट्रोल केले आहे.

पाकिस्तानच्या संघातील करारबद्ध खेळाडूंनी आता ५० लाख रुपयांची मदत करोनाग्रस्तांसाठी जाहीर केली आहे. श्रीलंकेच्या संघाने काही दिवसांपूर्वी सरकारला मदत केली होती. त्यानंतर बांगलादेशच्या क्रिकेट संघातील २७ खेळाडूंनी आपला पगार करोनाग्रस्तांसाठी मदत म्हणून दिला होता. आता पाकिस्तानचे खेळाडूही करोनाग्रस्तांसाठी पुढे सरसावले आहेत. पाकिस्तानच्या खेळाडूंनी ५० लाख रुपयांची मदत करोनाग्रस्तांना दिली आहे. पण बीसीसीआय किंवा आयपीएल कोणत्याही प्रकारची मदत करोनाग्रस्तांसाठी करताना दिसत नाही.

बीसीसीआय ही क्रिकेट विश्वातील महासत्ता आहे. एकिकडे श्रीलंकेचे क्रिकेट मंडळ सरकारला एक कोटी रुपये देते, काही संघांतील खेळाडू आपला पगार देत आहे. पण बीसीसीआय मात्र अजूनही करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आल्याचे दिसत नाही. त्यामुळेच चाहत्यांनी बीसीसीआयला धारेवर धरल्याचे पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानमध्ये सध्याच्या घडीला एक हजार करोनाबाधित रुग्ण आहेत. करोना व्हायरसचा फटका पाकिस्तानलाही चांगलाच बसलेला आहे. करोना व्हायरसमुळे पाकिस्तान सुपर लीगही रद्द करावी लागली होती. पण तरीही पाकिस्तानच्या खेळाडूंनी आणि क्रिकेट मंडळाने देशहितासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

करोनाग्रस्तांसाठी भारताचे खेळाडू कोणतीही आर्थिक मदत करताना दिसत नसले तरी बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी मात्र एक पाऊल पुढे टाकले आहे. करोनाग्रस्तांसाठी बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी आपला पगार सरकार देणार असल्याचे जाहीर केले आहे.

बांगलादेशच्या खेळाडूंनी एक पत्रक काढले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ” सध्याच्या घडीला बांगालादेश क्रिकेट बोर्डाबरोबर १७ खेळाडूंचे करार झाले आहेत. त्याचबरोबर १० क्रिकेटपटू बांगलादेशकडून सध्या खेळले आहे. या आम्ही १७ खेळाडूंनी मिळून आपला महिन्याचा अर्धा पगार करोनाग्रस्तांसाठी देण्याचे ठरवले आहे. ही रक्कम फारशी जास्त नाही, हेदेखील आम्हाला माहिती आहे. पण आपण जर एकत्र आलो आणि करोनाचा सामना केला तर त्याला आपण पळवून लाऊ शकतो.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here