विराट कोहलीचा कसोटी कर्णधारपदावरून पायउतार विराट कोहलीने टी 20 आणि एकदिवसीय कर्णधारपदानंतर भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपदही सोडलं आहे.  विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही महत्वाची माहिती दिली आहे.  आपल्या पोस्टमध्ये विराट कोहलीने रवी शास्त्री आणि धोनी यांचे आभार व्यक्त केले आहेत. विराटच्या पत्रात धोनी आणि रवी शास्त्री यांच्या नावाचा उल्लेख आहे. तसेच बीसीसीआय आणि चाहत्यांचेही विराट कोहलीने आभार व्यक्त केले आहेत. विराट कोहली कसोची कर्णधारपदावरुन अचानक पायउतार झाला. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. क्रीडा चाहत्यांनी विराटबद्दलच्या आपल्या सर्व भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. कलाकार, क्रिकेटर, खेळाडू, राजकीय नेत्यांसह सर्वांनीच विराटच्या निर्णायवर आपलं मत व्यक्त केलं आहे…पाहूयात कोण काय म्हणाले?

बीसीसीआय –
विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआयने ट्वीट केलं आहे. बीसीसीआय म्हणते की, विराट कोहलीचे अभिनंदन, ज्याने आपल्या प्रशंसनीय नेतृत्व गुणांमुळे संघाला अभूतपूर्व उंचीवर नेहले. विराट कोहलीने 68 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून 40 विजय मिळवले आणि तो सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?
प्रिय विराट कोहली, गेल्या अनेक वर्षांपासून लाखो क्रिकेट चाहत्यांनी तुमच्यावर खूप प्रेम केले आहे. तुझ्या या निर्णायातही  ते तुम्हाला साथ देतील. पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा!

अरुण धुमाळ, बीसीसीआयचे खजिनदार
विराट कोहलीच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. भारतीय क्रिकेटमध्ये विराटचे योगदान मोठे आहे.  कसोटी कर्णधार म्हणून त्याने भारताला जास्तीत जास्त विजय मिळवून दिले आहेत. कर्णधार नेमण्याचा निर्णय निवड समिती घेते, पदाधिकारी नव्हे. पुढील कसोटी कर्णधार कोण असेल ? यावर ते आपापसात चर्चा करतील, असे बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी सांगितले.

जय शाह, बीसीसीआय सचिव
कर्णधार म्हणून भारतीय संघासाठी विराट कोहलीने केलेल्या कामाचं अभिनंदन! विराट कोहलीने भारतीय संघात मोठे बदल घडवून आणले, ज्यामुळे भारताने विदेशातही उल्लेखनीय कामगिरी केली. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये विजय मिळवला आहे.

वीरेंद्र सेहवाग –
कर्णधार म्हणून विराट कोहलीने केलेल्या कामगिरीचे विरेंद्र सेहवागने अभिनंदन केलं आहे. सेहवाग म्हणतो, कर्णधार म्हणून उल्लेखनीय करिअरसाठी खूप खूप अभिनंदन, विराट! आकडे कधीच खोटं बोलत नाहीत. विराट फक्त भारताचाच सर्वोत्कृष्ट कसोटी कर्णधार नाही तर जगातील सर्वोत्कृष्ट कर्णधारापैकी एक आहे.

इरफान पठाण –
कसोटी क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेटच्या कर्णधारांची चर्चा होईल तेव्हा विराट कोहलीचे नाव सर्वात पहिले असेल.  फक्त निकालासाठीच नाही तर कर्णधार म्हणून त्याचा काय प्रभाव होता, हे आपल्याला माहित आहे. धन्यवाद विराट कोहली!

राजधानी दिल्ली –
भारताच्या सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार पायउतार झाला.  कसोटी कर्णधार म्हणून भारतासाठी केलेल्या सर्व कामगिरीसाठी विराट कोहलीचे धन्यवाद!

आरसीबी –
तुम्ही एक प्रेरणास्रोत आहात. त्यासोबतच उत्कृष्ट नेता आहात. भारतीय क्रिकेटला पुढे नेल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. 🙌🏻 तू आमच्यासाठी नेहमीच कर्णधार राहशील, आठवणींसाठी धन्यवाद, किंग !

केकेआर –
सात वर्ष तुम्ही तेजस्वीपणे कामगिरी केली. या काळात तुम्ही 120% पेक्षा अधिक दिले आहे.
आठवणी आणि वारसा
धन्यवाद, कॅप्टन

प्रविण कुमार –
अभिनंदन विराट कोहली…  कर्णधारपदाच्या यशस्वी कारकिर्दीवर अभिमान बाळगा. नेहमीप्रमाणे भारताचा अभिमान बाळगत राहा

सुरेश रैना –
कोहलीने घेतलेल्या या अचानक निर्णामुळे धक्का बसला आहे. कोहलीच्या निर्णायचं समर्थन करतो. भारतासाठी आणि जागतिकसाठी विराट कोहलीने केलेल्या कार्यबद्दल त्याचं कौतुक… विराट भारताचा सर्वाधिक आक्रमक आणि तंदुरुस्त खेळाडूपैकी एक आहे. खेळाडू म्हणून विराट अधिक चांगली कामगिरी करेल. कर्णधार म्हणून विराट कोहलीने केलेल्या कामाचे अभिनंदन!

मोहम्मद अझरुद्दीन –
भारतीय संघाचे नेतृत्व करणे हा नेहमीच सन्मानाचा क्षण आहे. हेच पद सोडणे खूपच भावनात्मक असते. कर्णधार म्हणून विराट कोहलीची कामगिरी उल्लेखनीय आहे.

युवराज सिंग –
किंग कोहली, हा एक उल्लेखनीय प्रवास होता. विराट कोहलीने जे केले ते खूप कमी लोकांना करता येते. क्रिकेटसाठी विराट कोहलीने सर्वस्व दिले आहे. विराट नेहमीच एखाद्या चॅम्पियनसारखा खेळला आहे.

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here