सध्याच्या घडीला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कारकिर्द धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. धोनीला आता भारतीय संघात स्थान मिळणार नाही, असेही म्हटले जात आहे. पण सध्या एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, ती गोष्ट म्हणजे धोनीला मिळालेले कर्णधारपद…

धोनीचे भवितव्य आयपीएलवर अवलंबून होते, असे म्हटले जात होते. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीची आयपीएलमधील कामगिरी पाहून त्याला भारताच्या ट्वेन्टी-२० संघात स्थान द्यायचे की नाही, यावर विचार करू असे म्हटले होते. पण सध्याच्या घडीला आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यानंतरही आयपीएल होणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे धोनी आता भारतीय संघात दिसणार नाही, असे म्हटले जाऊ लागले आहे.

आज खरंतर आयपीएलला सुरुवात होणार होती. पण करोना व्हायरसमुळे ती होऊ शकली नाही. पण भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने आपला आयपीएलचा संघ आज जाहीर केला आहे. या संघामध्ये त्याने धोनीला कर्णधारपद बहाल केले आहे. त्याचबरोबर या संघात रवींद्र जडेजाला बारावा खेळाडू ठेवण्यात आलेला आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू वसिम जाफरने आपला आयपीएलचा संघ आज जाहीर केला आहे. या संघात धोनी यष्टीरक्षक आणि कर्णधार असेल. त्याचबरोबर सलामीला भारताचा रोहित शर्मा आणि वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिकेटपटू ख्रिस गेल येतील. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सुरेश रैना आणि चौथ्या क्रमांकावर भारताचा कर्णधार विराट कोहलीला स्थान देण्यात आले आहे. या संघात आंद्रे रसेल आणि हार्दिक पंड्या हे दोघे अष्टपैलू खेळाडू असतील. रशिद खान आणि आर. अश्विन हे दोन फिरकीपटू या संघात आहेत. त्याचबरोबर जसप्रीत बुमरा आणि लसिथ मलिंगा या दोन वेगवान गोलंदाजांना या संघात स्थान देण्यात आले आहे, तर बारावा खेळाडू हा अष्टपैलू रवींद्र जडेजा आहे. सध्याच्या घडीला हा संघ चांगलाच चर्चेत आला आहे. त्याचबरोबर काही जणांनी या संघाचे कौतुकही केले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here