हायलाइट्स:

  • कोंबड्यांची झुंज लावून सुरू होता पैशांचा खेळ
  • पोलिसांनी छापा टाकून तिघांना केली अटक
  • उर्वरित १० ते ११ जण फरार

अहमदनगर : पाथर्डीत कोंबड्यांची झुंज लावून त्यावर पैसे लावत खेळल्या जाणाऱ्या खेळावर पाथर्डी पोलिसांनी रविवारी (१६ जानेवारी) सायंकाळी ५ वाजता छापा टाकून तिघांना अटक केली आहे. उर्वरित १० ते ११ जण फरार झाले आहेत. याप्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते. पाथर्डी शहाराजवळील माळी बाभूळगाव हद्दीत आणि धामणगावच्या डोंगराळ भागात ही कारवाई करण्यात आली आहे. (Ahmednagar गुन्हे बातम्या)

करीम सय्यद सय्यद (वय २३, रा. अंगूरीबाग मोढारोड, औरंगाबाद), अनिस रफीक शेख (वय ३४ रा. लक्कडकोट, येवाला, ता. येवाला जि. नाशिक), ओंकार कैलास चव्हाण (वय २९, रा. गणेशपेठ पुणे, ता. जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दिवसाच घरफोड्या होऊ लागल्याने तालुका हैराण; अखेर गावकऱ्यांनीच शक्कल लढवली आणि…

पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस प्रवीण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी सानप, सागर मोहिते आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी ११ ते १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, घटनास्थळी पकडण्यात आलेल्या तिघांकडून १ लाख ६४ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात जप्त करण्यात आलेल्या कोंबड्याचा पंचासमक्ष पाथर्डी पोलिसांनी लिलाव केला. या लिलावात बोली लावून सदर कोंबड्याचा लिलाव ५ हजार १०० रुपये, रोख रक्कम, दुचाकी व मोबाईल असा एकूण १ लाख ६४ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here