कराची: पाकिस्तानचे दिग्गज स्क्वॅश खेळाडू आजम खान यांचे लंडनमध्ये करोना व्हायरसने मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांनी रविवारी ही माहिती दिली. खान यांनी १९५९ ते १९६१ या काळात सलग ब्रिटन ओपनचे विजेतेपद मिळवले होते. गेल्या आठवड्यात त्याची करोना टेस्ट करण्यात आली होती आणि ती पॉझिटिव्ह होती. लंडनमधील ईलिंग रुग्णालयात शनिवारी त्यांचे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.

महान खेळाडू हाशिम खान याचे लहान बंधू असलेले आजम हे जगातील सर्वोत्तम स्क्वॅश खेळाडू होते. १९६२ साली त्याच्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर खान यांनी स्क्वॅश खेळणे बंद केले होते. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी पुन्हा स्क्वॅश खेळण्यास सुरुवात केली होती. पण मुलाच्या निधनाच्या दुख:तून कधीच बाहेर आलो नाही असे तेव्हा ते म्हणाले होते.

वाचा-
पाकिस्तानमधील पेशावर शहराच्या जवळ नवाकिले या छोट्या गावात आजम यांचा जन्म झाला होता. १९५६ पासून ते ब्रिटनमध्ये राहत होते. नवाकिले गावात त्यांची आणि त्यांच्या भावांची ओळख स्क्वॅश चॅम्पियन अशी केली जात असे. १९६२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा हार्डबॉल स्पर्धा असलेली युएस ओपनचे विजेतेपद मिळवले होते.

करोना व्हायरसने जगभरात ३१ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारत, पाकिस्तान, इंग्लंड, अमेरिका, इराण, स्पेन आणि इटली या देशात करोनाने बळी घेतले आहेत.

वाचा-
याआधी स्पेनमधील एका फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकाचा करोना व्हायरसने मृत्यू झाला होता. त्यानंतर या व्हायरसने क्रीडा क्षेत्रातील आणखी एकाचा बळी घेतला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here