वाचा-
इंग्लिश खेळाडूंमध्ये नॅट सिव्हरसह टॅमी ब्युमाँट, डेनी वायट, एमी जॉन्स आणि सोफी एक्लेस्टोन यांचा समावेश आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या तीन खेळाडू शबनीम इस्माईल, लॉरा वूलवॉर्ट आणि मारियन कॅप यांना स्थान मिळाले आहे. आयर्लंडची गॅबी लुईस, झिम्बाब्वेची लॉरिन फिरी यांनाही या संघात स्थान देण्यात आले आहे.
वाचा-
महत्वाची गोष्ट म्हणजे, गतविजेत्या टी-२० ऑस्ट्रेलिया संघातील एकाही खेळाडूला संघात स्थान मिळालेले नाही. स्मृती मंधानाने गेल्या वर्षी टी-२० फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. तिने नऊ सामन्यांमध्ये ३१.८७ च्या सरासरीने २५५ धावा केल्या होत्या. यामध्ये दोन अर्धशतकांचाही समावेश आहे. यादरम्यान तिचा स्ट्राइक रेट १३१.४४ होता. तिची सहकारी सलामीवीर म्हणून निवड झालेल्या ब्युमाँटने नऊ सामन्यांमध्ये ३३.६६ च्या सरासरीने तीन अर्धशतकांच्या मदतीने ३०३ धावा केल्या आहेत.
वाचा-
आयसीसी महिला टी-२० टीम ऑफ द ईयर २०२१ :
स्मृति मंधाना, टॅमी ब्यूमाँट, डेनी वायट, गॅबी लुईस, नॅट सिव्हर (कर्णधार), एमी जॉन्स, लॉरा वूलवार्ट, मारियन कॅप, सोफी एक्लेस्टोन, लॉरिन फिरी, शबनीम इस्माइल
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times