भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकातील सामना म्हणजे चाहत्यांसाठी महायुद्ध. असेच एक महायुद्ध २०११ साली मोहालीच्या मैदानात झाले होते. या सामन्यातच आतापर्यंतचा क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा डीआरएसचा निर्णय पाहिला गेला. हा डीआरएसचा निर्णय होता तो भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्याबाबत.

नेमके घडले तरी कायमोहाली येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना आज खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांकडून सर्वात अनुभवी खेळाडू होता तो सचिन. या सामन्याच्या ११व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पाकिस्ताडनचा फिरकीपटू सइद अजमलने सचिनला पायचीत पकडले होते. यानंतर पाकिस्तानच्या संघाने जोरदार अपील केली आणि पंच इयान गोऊल्ड यांनी सचिनला बाद ठरवले. यावेळी सचिनच्या मनात आपण बाद नसल्याचे वाटत होते. पण त्याने दुसऱ्या टोकाकडे उभ्या असलेल्या गौतम गंभीरला याबाबत विचारले. यावेळी डीआरएस घ्यायचा की नाही, हा विचार सचिनच्या डोक्यात सुरु होता. कारण यापूर्वी घेतलेला एक डीआरएसचा निर्णय चुकीटा ठरला होता. पण सचिनने यावेळी डीआरएसचा निर्णय घेण्याचे ठरवले. त्यावेळी तिसऱ्या पंचांनी सर्व गोष्टी पुन्हा एकदा पाहायला सुरुवात केली. त्यावेळी हा चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर पडला होता. त्याचबरोबर हा चेंडू कोणत्याही स्टम्पला लागत नव्हता. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी यावेळी सचिनला नाबाद ठरवले. आतापर्यंतच्या क्रिकेट इतिहासामध्ये हा सर्वात मोठा डीआरएसचा निर्णय असल्याचे म्हटले जाते. कारण सचिनला जेव्हा हे जीवदान मिळाले तेव्हा सचिन २६ चेंडूंत २३ धावांवर होता. यानंतर सचिनने या सामन्यात ८५ धावा केल्या आणि तो सामनावीराचामानकरी ठरला होता.

आजच्या दिवशी २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीतील लढत झाली होती. भारताने उपांत्य पूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. या सामन्यात सर्वांची नजर सचिन तेंडुलकरवर होती. कारण सचिनच्या नावावर ९९ आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद झाली होती. पाकिस्तानविरुद्ध सचिन १००वे शतक पूर्ण करेल असे सर्वांना वाटत होते. विशेष म्हणजे मोहालीत झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने सचिनचे एक नव्हे तर चार कॅच सोडले. पण सचिन या सामन्यात १०० धावा करू शकला नाही. तो ८५ धावांवर बाद झाला भारताने या सामन्यात २६० धावा केल्या.

पाकिस्तानने सातत्याने विकेट विकेट गमावल्या आणि भारताने हा सामना २९ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजय परंपरा कामय राखली होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here