भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिका: भारत आणि दक्षिण यांच्यात आज (21 जानेवारी) दुसरा एकदिवसीय मालिका खेळला जाणार आहे. हा सामना बोलंड पार्क, पर्ल (Boland Park, Paarl) येथे खेळला जाणार आहे. दरम्यान, तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 31 धावांनी पराभव पत्कारावा लागला होता. यामुळं एकदिवसीय मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला आजचा सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासह एकदिवसीय मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला शुक्रवारी फलंदाजीत आमूलाग्र सुधारणा करावी लागणार आहे. याशिवाय केएल राहुलच्या नेतृत्वकौशल्याचाही कस लागणार आहे. पहिल्या सामन्यात विराट कोहली असताना भेडसावणारी मधल्या फळीची समस्या पुन्हा समोर आली. तर, गोलंदाजही महाग ठरले. भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूर चांगली कामगिरी करता आली नाही. याचबरोबर चहल-अश्विनलाही अपेक्षित यश मिळाले नाही. या दोघांनी 20 षटकांत 106 धावा मोजल्या. यामुळं दुसऱ्या सामन्यात भारत तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. कारण, पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले होते. मार्करम, तबरेझ शम्सी आणि केशव महाराज या आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांनी 26 षटकांत 124 धावा दिल्या आणि चार फलंदाज बाद केले.
हवामान आणि खेळपट्टी-
बोलंड पार्क, पर्ल येथील हवामान आज उष्ण असणार आहे. पहिल्या गेमप्रमाणेच खेळपट्टी संथ आणि वळण देणारी असेल अशी अपेक्षा आहे. यामुळं आजच्या सामन्यात दोन्ही संघ आपपल्या उत्कृष्ट फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.
फेडरेशन-
भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, दीपक चहर, सूर्यकुमार यादव, , नवदीप सैनी, इशान किशन, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, रुतुराज गायकवाड
दक्षिण आफ्रिका संघ: क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), जेनेमन मलान, टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, सिसांडा मगला, झुबेर हमझा, काइल वेरेन
हे देखील वाचा-
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
sports