मुंबई : भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगला कोविड-१९ ची लागण झाली आहे. ही माहिती स्वत: हरभजनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. तसेच जे लोक अलीकडेच त्याच्या संपर्कात आले होते, त्यांनी शक्य तितक्या लवकर स्वतःची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्याने केले आहे.

वाचा-दुसऱ्या वनडे भारताने घेतला महत्त्वाचा निर्णय; अशी आहे टीम इंडिया

हरभजनने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मी कोविड पॉझिटिव्ह आढळलो आहे. माझी लक्षणे सौम्य आहेत. मी स्वत:ला घरी आयसोलेट करून घेतलं आहे आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी लवकरात लवकर स्वतःची कोविड चाचणी करून घ्यावी. कृपया, सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या.’

वाचा- टी-२० वर्ल्डकप २०२२: टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर पाहा, पहिली लढत

वाचा- टी-२० वर्ल्डकप: आयसीसीचा शंखनाद! ‘या’ दिवशी होणार

दरम्यान, हरभजनने गेल्या वर्षी २४ डिसेंबर रोजी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा सोशल मीडियाद्वारेच केली होती. त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीच्या वेळी त्याने भविष्यात पंजाबची सेवा करायची असल्याचे सांगितले होते, पण याबाबतचा सविस्तर खुलासा त्याने केला नाही.

वाचा- ‘विराट जी ऊर्जा घेऊन मैदानात यायचा ती गायब होती’; राहुलच्या कर्णधारपदावर हा खेळाडू नाराज

२३ वर्षे भारतासाठी क्रिकेट खेळला
हरभजन सिंग २३ वर्षे भारतीय क्रिकेटमध्ये खेळत राहिला. याकाळात त्याने एकूण ७११ विकेट घेतल्या. २३ वर्षांचा दीर्घ प्रवास सुंदर आणि संस्मरणीय असल्याचे त्याने निवृत्ती घेताना म्हटले होते. हरभजन हा दोन विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग राहिला आहे. त्याने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

हरभजन सिंग

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here