करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आता भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे पुढे सरसावले आहेत. विराट आणि अनुष्का यांन करोनाग्रस्तांसाठी कोट्यावधींची मदत केली आहे. पण आपण नेमकी किती मदत केली हे मात्र या दोघांनी गुपित ठेवण्याच ठरवले आहे. याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

सध्याच्या घडीला बऱ्याच क्रीडापटूंनी करोनाग्रस्तांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. यामध्ये आता विराटचेही नाव जोडले जाईल. पण विराटने नेमकी किती रुपयांची मदत केली, हे बऱ्याच जणांना माहिती नसेल.

बॉलीवूडमधील सूत्रांच्या म्हणण्यानुसार बॉलीवूड हंगामा या संकेतस्थळाने याबाबतची माहिती दिली आहे. विराट आणि अनुष्का यांनी मिळून तीन कोटी रुपयांची मदत केल्याचे या संकेतस्थळावर म्हटले गेले आहे, पण महाराष्ट्र टाइम्सने याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.

काही दिवसांपासून भारतामध्ये करोनाग्रस्तांसाठी खेळाडू पुढे सरसावल्याचे पाहायला मिळत आहेत. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही ५० लाखांची मदत जाहीर केली होती. या मदतीसाठी सर्वात पहिला उतरलेला क्रिकेटपटू म्हणजे भाजपाचा खासदार गौतम गंभीर. करोनाग्रस्तांसाठी गंभीरने पहिल्यांदा ५० लाख रुपयांची मदत केली होती. त्याचबरोबर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही मदतीचा हात पुढे केला होता. भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनानेही ५२ लाखांची मदत जाहीर केली होती. भारताचे माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआयचे अध्यक्ष यांनी या संकटकाळात शाळा किंवा धर्मशाळेत अडकलेल्या लोकांसाठी ५० लाख रुपयांचे तांदूळ दान दिले होते.

करोना व्हायरसपासून बचावासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. अनेकांना घरी थांबावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाविरुद्धच्या लढाईत सर्वांना घरी राहण्याचे आणि दान करण्याचे आवाहन केले आहे.

या व्हायरसमुळे जगभरात ३१ हजार लोकांचा मृत्यू झाला असून भारतात एक हजारहून अधिक रूग्ण आढळले आहेत. भारतातील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २९ वर पोहोचली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here