सुभाष भौमिक यांचे ७२ व्या वर्षी निधन भारताचे भाजी फुटबॉलपटू (Indian Stalwart Footballer) आणि एशियन गेम्स मेडलिस्ट (Asian Games Medallist) सुभाष भौमिक यांचं आज निधन झालंय. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ते गेल्या काही दिवसांपासून मधुमेह आणि किडनीशी संबंधित आजारानं त्रस्त होते. मात्र, आज अखेर पहाटे 3.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सुभाष भौमिक यांनी मोहन बागान, पूर्व बंगाल आणि भारताच्या राष्ट्रीय संघासाठी अनेक सामन्यांमध्ये भाग घेतला होता. त्यांनी 1970 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. ही त्यांची सर्वात मोठी कामगिरी होती.

सुभाष भौमिक हे स्ट्रायकर म्हणून भारतीय फुलबॉल संघाचा भाग होते. यासोबतच 1971 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या पेस्ता सुकान चषक स्पर्धेत दक्षिण व्हिएतनामसोबत संयुक्तपणे जिंकलेल्या भारतीय संघाचाही ते सदस्य होते. 1970 च्या मर्डेका चषकातही त्यांना कांस्यपदक मिळालं होतं. 1971 मध्ये रशियाच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचाही ते सदस्य होते.

सुभाष भौमिक हे खूप यशस्वी प्रशिक्षकही राहिले आहेत. ते दीर्घकाळ वेगवेगळ्या फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक होते. सुभाष भौमिक यांनी ईस्ट बंगाल, मोहन बागान, मोहम्मदन स्पोर्टिंग, साळगावकर आणि चर्चिल ब्रदर्स या फुटबॉल क्लबना प्रशिक्षण दिलंय.

भौमिक यांच्या निधनाबद्दल त्यांचे चाहते ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अनेक वर्तमान आणि माजी भारतीय फुटबॉल खेळाडू आणि भारताच्या राष्ट्रीय संघानेही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here