बॅडमिंटनच्या कोर्टपेक्षा महिला खेळाडू ज्वाला गट्टा ही आपल्या अफेअर्समुळे जास्त चर्चेत राहिली. सध्याच्या घडीला देशामध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वच जण आपल्या घरामध्ये बंदिस्त आहेत. पण यावेळी मात्र ज्वालाला आपल्या बॉयफ्रेंडची आठवण येत आहे. ज्वालाने असे ट्विटही केले आहे आणि तिच्या या ट्विटला तिच्या बॉयफ्रेंडनेही चांगलेच उत्तर दिले आहे.

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनबरोबर तिचे अफेअर असल्याचे म्हटले जात होते. सध्याच्या घडीले तिचे अफेअर हे अभिनेता विष्णू विशालबरोबर आहे.

ज्वालाने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ज्वालाटने आपला बॉयफ्रेंड विष्णूबरोबरचे काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोवर मला तुझी आठवण येते, असे ज्वालाने लिहिले आहे.

ज्वालाच्या या ट्विटला विष्णूनेही चांगलेच उत्तर दिले आहे. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणाला आहे की, ” सध्याच्या घडीला देशामध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे आपल्याला सध्या तरी भेटता येणार नाही.”

सध्याच्या घडीला देशात लॉकडाऊन आहे. भारतामध्ये हे लॉकडाऊन २१ दिवस असणार आहे. या लॉकडाऊनच्या काळात काही खेळाडू लोकांच्या मदतीसाठीही पुढे आलेले पाहायला मिळत आहे. बऱ्याच खेळाडूंनी आणि क्रीडा संघटनांनी आर्थिक मदतही दिलेली आहे. त्याचबरोबर ते लोकांना याबाबत आवाहनही करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपासून भारतामध्ये करोनाग्रस्तांसाठी खेळाडू पुढे सरसावल्याचे पाहायला मिळत आहेत. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही ५० लाखांची मदत जाहीर केली होती. या मदतीसाठी सर्वात पहिला उतरलेला क्रिकेटपटू म्हणजे भाजपाचा खासदार गौतम गंभीर. करोनाग्रस्तांसाठी गंभीरने पहिल्यांदा ५० लाख रुपयांची मदत केली होती. त्याचबरोबर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही मदतीचा हात पुढे केला होता. भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनानेही ५२ लाखांची मदत जाहीर केली होती. भारताचे माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआयचे अध्यक्ष यांनी या संकटकाळात शाळा किंवा धर्मशाळेत अडकलेल्या लोकांसाठी ५० लाख रुपयांचे तांदूळ दान दिले होते. त्यानंतरही बऱ्याच खेळाडूंनी मदत दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here