केप टाउन: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात संपूर्ण जगाने प्रथमच विराट कोहली-अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिकाला पाहिले. अनुष्का सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते आणि तिच्या सोबत एक वर्षाची वामिका देखील. वामिकाचा जन्म ११ जानेवारी २०२१ रोजी झाला. तेव्हापासून विराट आणि अनुष्का यांनी तिचा कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही. या दोघांनी मुलीचा फोटो काढू नका अशी विनंती देखील केली होती.

वाचा- विजयाच्या उंबरठ्यावर बाद झाला दीपक चाहर; आयुष्यभर या गोष्टीचे….

भारत आणि द.आफ्रिका यांच्यातील सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक झळकावले. त्यानंतर अनुष्काने वामिका सोबत बापाला टाळ्या वाजवून दाद दिली. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्यास वेळ लागला नाही. पण विराट यामुळे खुश नाही. त्याने सामना झाल्यावर सोशल मीडियावर एक पोस्ट लिहली. या पोस्टमध्ये त्याने विनंती केली की, कृपया वामिकाचा फोटो छापू नका.

वाचा- विराट कोहलीकडून राष्ट्रगीताचा अपमान; चाहत्यांनी दिला टोकाचा इशारा

विराटने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात तो म्हणतो, हॅलो मित्रांनो, काल सामना सुरू असताना स्टेडियममध्ये आमची मुलीचा फोटो घेण्यात आला आणि तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आम्हाला कल्पना नव्हती की कॅमेऱ्याचा फोकस आमच्यावर आहे आणि त्याचे चित्रिकरण घेतले जात आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे की वामिकाचा फोटो काढू नका किंवा तो छापू देखील ना. या मागील कारण देखील तेच आहे जे आम्ही पूर्वी सांगितले होते. धन्यवाद.

वाचा- डी कॉकच्या एका शतकाने झाले अनेक वर्ल्ड रेकॉर्ड

व्हायरल फोटोमध्ये अनुष्काने ब्लॅक ड्रेस घातला होता. तर वामिकाने पिंक रंगाचा ड्रेस घातला होता. सोशल मीडियावर अनेकांनी वामिका विराट सारखी दिसते असे मत व्यक्त केले आहे. काहींनी विराटच्या लहानपणीचा फोटो शेअर करत वामिकाशी त्याची तुलना केली. काहीच दिवसांपूर्वी फोटो न काढल्याबद्दल या दोघांनी पॅपराजीचे आभार व्यक्त केले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here