लंडन: करोना व्हायरने जगभरात ३१ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. क्रीडा क्षेत्रातील दोघांचा या व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यू झाला होता. यातील पहिला मृत्यू स्पेनमधील एका फुटबॉल प्रशिक्षकाचा होता. त्यानंतर लंडनमध्ये पाकिस्तानच्या स्क्वॅशपटूचा मृत्यू झाला होता. आता क्रीडा क्षेत्राताल आणखी एक धक्का बसला आहे. करोना व्हायरसने क्रिकेटमधील एकाचा मृत्यू झाला आहे.

वाचा-
इंग्लंडमधील काऊंटी क्लब लँकेशायर संघाचे चेअरमन डेव्हिड हॉगकिस यांचे करोना व्हायरसने निधन झाले. ते ७१ वर्षाचे होते. हॉगकिस यांना करोना व्हायरसची लागण झाली होती. लँकेशायर संघाने यासंदर्भात निवेदन दिले आहे. क्लबच्या एका प्रवक्त्याने प्रेस असोसिएशनला हॉगकिस यांचे करोना व्हायरसमुळे निधन झाल्याचे सांगितले.

वाचा-
डेव्हिड यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह लँकेशायर संघाचे मोठे नुकसान झाले आहे. डेव्हिड यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती. गेल्या ३ वर्षांपासून ते संघाचे मॅनेजर होते. त्याआधी त्यांनी २२ वर्ष ओल्ड ट्रॅफर्ड सोबत काम केले होते. लँकेशायर संघाचे पहिले कोषाध्यक्ष आणि व्हाइस चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले.

वाचा-
डेव्हिड हॉगकिस हे लँकेशायर संघा महत्त्वाचा भाग होते. काऊंटी क्रिकेटच्या विकासासाठी आणि क्रिकेटसाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

शनिवारी पाकिस्तानचे दिग्गज स्क्वॅश खेळाडू आजम खान यांचा लंडनमध्ये करोना व्हायरसने मृत्यू झाला होता. खान यांनी १९५९ ते १९६१ या काळात सलग ब्रिटन ओपनचे विजेतेपद मिळवले होते. गेल्या आठवड्यात त्याची करोना टेस्ट करण्यात आली होती आणि ती पॉझिटिव्ह होती. ते ९५ वर्षांचे होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here