आफ्रिदीचे कौतुक केल्याबद्दल सोशल मीडियावर या दोघांनाही ट्रोल केले जात आहे. अनेक नेटिझन्सनी या दोघांना तुम्हाला लाज वाटत नाही का असा प्रश्न विचारला आहे. इतक नव्हे तर काहींनी तर युवराज सिंगला ब्लॉक केले आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. विशेष म्हणजे भारतात #ShameOnYuviBhajji हा हॅशटॅग ट्रेंडिगमध्ये आहे.
वाचा-
मंगळवारी दुपारी युवराजने एक ट्वीट केले होते. यात त्याने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आफ्रिदीचे आणि त्याच्या संस्थेला पाठिंबा दिला होता. या कठीण काळात आपल्याला एकमेकांची मदत करण्याची गरज आहे. शाहीद आफ्रिदी आणि एसएएफ संस्थेला पाठिंबा देतो. कृपया डोनेटकोरोना डॉट कॉमवर लॉगइन करून दान करा. घरी रहा, असे युवराजने म्हटले होते.
युवराजच्या या ट्वीटमध्ये हरभजन सिंगला देखील टॅग करण्यात आले होते. युवीच्या आधी हरभजन सिंगने आफ्रीदीचे कौतुक केले होते. काही दिवासांपूर्वी आफ्रीदीने पाकिस्तानमधील गरजू लोकांना साहित्य वाटप केले होते. तेव्हा हरभजनने सोशल मीडियावरून त्याचे कौतुक केले होते.
युवराजच्या या ट्विटवरून आता सोशल मीडियावर नेटझन्स भडकले आहेत. अनेक युझर्स युवी आणि हरभजन सिंग यांना ट्रोल करत आहेत. ट्वीट करण्याच्या आधी तुम्ही विचार करायला हवा. आफ्रिदीच्या संस्थेला माझ्याकडून मदत असे म्हणत संबंधित युझरने युवराज सिंगला ब्लॉक केलेला फोटो शेअर केला आहे.
अशाच पद्धतीने अनेकांनी या दोन्ही माजी क्रिकेटपटूंना ब्लॉक केले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times