नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण या लिलावात सर्वात महत्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे तुमच्या हातात असलेली रक्कम. आयपीएलपूर्वी १० संघांच्या हातात किती करोडोंची रक्कम आहे, याची माहिती आता समोर आली आहे.

मुंबई इंडियन्समुंबई इंडियन्सच्या संघाने लिलावापूर्वी रोहित शर्मा (१६ कोटी), जसप्रीत बुमरा (१२ कोटी), सूर्यकुमार यादव (८ कोटी) आणि कायरन पोलार्ड (६ कोटी) यांना आपल्या संघात रिटेन (कायम ठेवणे) केले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाकडे आयपीएलच्या लिलावासाठी आता ४८ कोटी रुपये एवढी रक्कम शिल्लक आहे.

चेन्नई सुपर किंग्सचेन्नईच्या संघाने रवींद्र जडेजा (१६ कोटी), महेंद्रसिंग धोनी (१२ कोटी), मोइन अली (८ कोटी) आणि ऋतुराज गायकवाड (६ कोटी) यांना आपल्या संघात कायम ठेवले आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघाकडेही ४८ कोटी एवढी रक्कम शिल्लक आहे.

अहमदाबादयावर्षी आयपीएलमध्ये पहिल्यांदाच अहमदाबादच्या संघाने एंट्री घेतली आहे. अहमदाबादने हार्दिक पंड्या (१५ कोटी), रशिद खान (१५ कोटी) आणि शुभमन गिल (८ कोटी) यांना संघात कायम ठेवले आहे, त्यामुळे त्यांच्याकडे सध्याच्या घडीला ५२ कोटी रुपये शिल्लक आहेत.

दिल्ली कॅपिटल्सदिल्ली कॅपिटल्सच्या संघाने रिषभ पंत (१६ कोटी), अक्षर पटेल (९ कोटी), पृथ्वी शॉ (७.५ कोटी) आणि एनरीच नॉर्टजे (६.५ कोटी) यांना संघात कायम ठेवले असून त्यांच्याकडे ४७.५ कोटी एवढी रक्कम शिल्लक आहे.

कोलकाता नाइट रायडर्स कोलकाता नाइट रायडर्सने आंद्रे रसेल (१२ कोटी), वेंकटेश अय्यर (८ कोटी), वरुण चक्रवर्ती (८ कोटी) सुनील नरिन (६ कोटी) यांना संघात कायम ठेवले असून त्यांच्याकडे आता ४८ कोटी एवढी रक्कम लिलावासाठी हातामध्ये आहे.

लखनौ सुपर जायंट्सयावर्षी आयपीएलमध्ये लखनौचा संघ पहिल्यांदाच उतरणार आहे. लखनौच्या संघाने यावेळी लोकेश राहुल (१७ कोटी), मार्कस स्टॉइनिस (९.२ कोटी ) आणि रवी बिश्नोई (४ कोटी) यांना संघात स्थान दिले आहे, पण त्यांच्याकडे अजून ५९ कोटी एवढी रक्कम शिल्लक आहे.

पंजाब किंग्सपंजाब किंग्सच्या संघातून कर्णधार लोकेश राहुल बाहेर पडला आहे. त्यामुळे पंजाबच्या संघाने मयांक अगरवाल (१२ कोटी) आणि अक्षरदीप सिंग (४ कोटी) यांना संघात स्थान दिले आहे, त्यामुळे आयपीएलच्या लिलावासाठी सर्वाधिक ७२ कोटी एवढी रक्कम त्यांच्या हातामध्ये आहे.

आरसीबीरॉयल चॅलेंजर्स बंगगळुरुच्या संघाने आपल्याकडे विराट कोहली (१५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल (११ कोटी) आणि मोहम्मद सिराज (७ कोटी) यांना कायम ठेवले आहे, त्यामुळे लिलावासाठी त्यांच्याकडे ५७ कोटी रुपये शिल्लक आहेत.

राजस्थान रॉयल्सराजस्थान रॉयल्सच्या संघाने कर्णधारप संजू सॅमसन (१४ कोटी), जोस बटलर (१० कोटी) आणि यशस्वी जैस्वाल (४ कोटी) यांना संघात कायम ठेवले आहे, त्यामुळे त्यांच्या हातामध्ये आता ६२ कोटी एवढी रक्कम आहे.

सनरायझर्स हैदराबादहैदराबादच्या संघाने यावेळी कर्णधार केन विल्यम्ससनला १४ कोटी रुपये देत संघात कायम ठेवले आहे, त्याचबरोबर समद आणि मलिक यांना प्रत्येकी चार कोटी रुपये देत संघात स्थान दिले आहे. त्यामुळे आता हैदराबादच्या संघाकडे लिलावासाठी ८ कोटी एवढी रक्कम आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here