वाचा-
करोना व्हायरसमुळे बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित केली होती. पण आता १५ एप्रिलनंतर देखील ही स्पर्धा होण्याची शक्यता वाटत नाही. आयपीएल खेळवण्याच्या पर्यायावर बीसीसीआय विचार करत असला तरी त्यावर देखील ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. आयपीएलवरील या अनिश्चितचेचा पहिला फटका संघाला बसला आहे. राजस्थान संघाने दुबई एक्सपो सोबत जर्सीसाठी करार केला होता. दुबई एक्सपोने स्पॉन्सरशिप डील रद्द केली आहे.
वाचा-
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार एका वर्षासाठीच्या २५ कोटींचा हा करार सध्या गुंडाळण्यात आला आहे. या वर्षी २१ जानेवारी रोजी राजस्थान आणि दुबई एक्सपो यांच्यातील कराराची घोषणा झाली होती. यानुसार वर्ल्ड एक्सपो हा खेळाडूंचा मुख्य स्पॉन्सर होता आणि राजस्थानच्या खेळाडूंच्या जर्सीवर समोरच्या बाजूला दुबई एक्सपो असे लिहले जाणार होते.
वाचा-
हा करार रद्द झाल्याने आता राजस्थान रॉयल्स संघाकडे जर्सीसाठी स्पॉन्सर नाही. संघाला उत्पन्नासाठी अन्य मार्गाचा विचार करावा लागणार आहे. दुबई एक्सपोने या वर्षासाठी करार रद्द केला असला तरी ते पुढच्या वर्षी पुन्हा स्पॉन्सर म्हणून येतील असा विश्वास राजस्थान संघाच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केला.
दरम्यान, बीसीसीआय २१ दिवसाच्या लॉकडाऊन नंतर केंद्र सरकार कोणता निर्णय घेते त्यानुसार आयपीएल स्पर्धेबाबत विचार करणार असल्याचे समजते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times